कोरपना तालुक्यातील अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या कढोली (खु.) – आवाळपूर सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेस प्रणित महाविकास शेतकरी सहकार आघाडीने बाजी मारली आहे.
अंकित खेलुरकर
कोरपना तालुका प्रतिनिधी
निवडणुकीत काँग्रेसने १३ पैकी १३ उमेदवार विजयी करुन एकहाती सत्ता मिळविलेली आहे.
शेतकरी संघटना, भाजपा आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी एकत्र येऊनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सर्वसाधारण कर्जदार खातेदार गटातून शुभम दिवाकर आस्वले, रमेश पत्र कुंभारे, रामदास कवडू चिंचोलकर, किसन देवराव टोंगे, हरिश्चंद्र जनार्दन पिंपळकर, विजय नानाजी बोंडे, अनिल विठ्ठल मुसळे, रामचंद्र जागोबा वाटे विजयी झाले. महिला राखीव गटातून सिंधू जगन्नाथ दरेकर, सुरेखा सुधाकर हेकाड, अनुसूचित जाती जमाती गटातून गोसाई चिंतामण वानखेडे, इतर मागासवर्गीय गटातून मधुकर लटारी वडस्कर आणि भटक्या जमाती गटातून सुनिल हरी दरेकर अशा एकूण १३ उमेदवारांनी विजय मिळविलेला आहे.
एकूण ३१० मतदारांपैकी ३०६ जणांनी मतदान केले.
आमदार सुभाष धोटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजय बावणे
यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती.