बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही= पालकमंत्री गुलाबराव पाटील

बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही=
पालकमंत्री गुलाबराव पाटील

बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही= पालकमंत्री गुलाबराव पाटील

ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602

पाचोरा :- पाचोरा येथील महालपुरे मंगल कार्यालयात शिवसंपर्क अभियानाचा समारोप मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बाळासाहेबांसारखी भगवी शाल घेतली म्हणजे कोणीही बाळासाहेब होऊ शकत नाही. अशा शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका करत परखड शब्दात अनेक बाबींचा समाचार घेतला.

या कार्यक्रमास शिवसेनेचे उपनेते तथा जिल्ह्याचे निरीक्षक लक्ष्मणराव वडले, आमदार किशोर पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, महानगर प्रमुख शरद तावडे, उपसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, डॉ. हर्षल माने, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, उप महापौर कुलभूषण पाटील, सुनिल पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख अभय पाटील, पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, उपजिल्हाप्रमुख जितेंद्र जैन, प्रविण ब्राम्हणे शिवदास पाटील, रवि गीते आदींची उपस्थिती

यावेळी खा. उन्मेष पाटील यांच्यावर टिका करतांना ना. पाटील म्हणाले की, “गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अवघ्या ९ दिवसांत मोठ्या फरकाने निवडून आणले. मात्र ते माझ्या निवडणुकीचा साधा उमेदवारी अर्जही दाखल करण्यासाठी आले नाही. ते जर आम्हाला होत नाही तर सर्व सामान्य जनतेला काय होतील. असे उपस्थित पदाधिकाऱ्यांना त्यांनी आश्वासित केले. भविष्यातील नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असुन येत्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची सत्ता ही एक हाती शिवसेनेकडे असेल.” असा आस्वाद त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्याच्या समारोप प्रसंगी आ. किशोर पाटील, गुलाबराव वाघ, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, विष्णु भंगाळे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी नगरदेवळा, गाळण व शिंदाड येथील अनेक युवक व महिलांनी विविध पक्षातुन शिवसेनेत प्रवेश केला. मेळाव्याचे सुत्रसंचलन नाना वाघ यांनी केले.

शिवसंपर्क अभियाना निमित्त आ. किशोर पाटील, लक्ष्मणराव वडले, संजय सांवत, सुमित किशोर पाटील, किशोर बारावकर यांचेसह युवा सेनेच्या पदाधिकारी व युवकांनी मोटरसायकल वरुन भगवे झेंडे लावुन महालपुरे मंगल कार्यालया पासून जारगाव चौफुली, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजे संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौकापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती.