धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवले प्राण

धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवले प्राण

धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने वाचवले प्राण

✍त्रिशा राऊत ✍
नागपुर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
📲,9096817053📱

नागपूर : ,सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आहे की धावत्या रेल्वेगाडीत चढण्याचा प्रयत्न करीत असलेल्या एका महिला प्रवाशाचं तोल गेला आणि ती पडत असतानाच एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने तिला वाचवले. ही घटना नागपूर रेल्वे स्टेशनवर फलाट क्रमांक एकवर घडली.चेन्नई ते निजामुद्दीन ही रेल्वे गाडी नागपूर येथून निघाली आणि तितक्यात एका महिलेने धावत धावत या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला. ती चढण्याचा प्रयत्न करत असतानाच तिचा तोल गेला. यावेळी फलाट क्रमांक एकवर उभे असलेल्या जवानांना महिलेचा तोल जाताना दिसताच त्यांनी धाव घेऊन तिला वाचवले.या ४५ वर्षीय महिलेचे नाव पीसी सरेना आहे. त्या मूळच्या केरळ येथील कन्नूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्या एस-२ डब्यातून प्रवास करत होत्या.