होमगार्ड समाजदेशक आणि पाठबधारे शिपाई वसंत खैरे आपली खरी सेवा देऊन निवृत्त
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१
समाज प्रेमी असलेले माणगांव साईनगर येतील रहिवाशी असलेले आवलिया म्हणजे वसंत धोंडू खैरे हे होमगार्ड समाजदेशक अधिकाऱ्यांच्या रुबाबदार ड्रेस मध्ये पाहिले असता प्रत्येक मित्र त्यांना सलाम ठोकताना दिसत आहेत.खाकी ड्रेस पिलदार मिशी रुबाबदार फेहराव पाहता त्याच्यात समाज प्रेम नसानासात आढलते पाठबांधारे विभागात ४२ वर्ष सेवा करीत असताना अल्पशा मानधनात होमगार्ड या खात्यात सामादेसक अधिकारी म्हणून निवृत्त झाले तसेच या ३१ मे २०२२ रोजी पाठबधारे विभागातुन निवृत्त झाले आहेत खात्यात काम करीत असताना शेकडो तरुण तरुणीना होमगार्ड मध्ये सामावून घेण्यात त्याचा मोलाचा वाटा होता त्याच्या कारकिर्दीत माणगांव पोलीस स्टेशनं मध्ये दोन अधिकारी व २५ कर्मचारी स्टाफ असताना होमगार्ड चे १०० च्या वर कर्मचाऱ्यांच्या सह्यायाने माणगांव पोलीस स्टेशनं च्या प्रत्येक कार्यात मोलाची मदत केली. माणगांव तला रोहा म्हसळा या चार तालुक्यातील अनेक कुटूंबाना न्याय मिळवून दिला वेळ आली तर कडक भूमिका घेऊन घराघरात होणारी भांडणे मिटवून शेकडो कुटूंबाना देशोधडीला व उद्वस्त होण्यापासून वाचवले अशा एक वेगळ्या अवलिया कामाची पद्धत पाहून अनेक गोरगरीब जनता धन्यवाद देत आहेत.
वसंत धोंडू खैरे हे मुळगाव वावे ता माणगांव जि रायगड येतील असून ते सध्या साईनगर माणगांव मध्ये १५ जणांचे भक्कम कुटूंबात गुण्या गोविदाने राहत आहेत.
आजच्या धक्का धक्कीच्या जीवनात प्रत्येक कुटुंब लग्न झाल्यावर विभक्त होत आहेत प्रत्येक जण आपले स्वतःचे पाहत आहेत नात्या नात्यात दरी पडत आहे असल्या कलियुगात कोणत्याही जाती धर्माच्या पंथमध्ये भक्कम कुटुंब पाहणे दुर्मिळ झाले आहे परंतु आपले स्वतःचे १५ जणांचे कुटुंब योग्य नियोजन करून आपाआपसात आनंदाची भावना ठेवून भक्कम ठेवलं आहे.
त्याच्या या महान कार्यात हिरहीरीणे साथ दिली ती त्याच्या धर्म पत्नीने आरोग्य खात्यात आपली खरी सेवा देऊन शेकडो गोरगरीब जनतेची आशीर्वाद घेतले त्याच्या धर्म पत्नी गत वर्षी सेवेतून निवृत्त झाल्या आहेत. त्याच प्रमाणे वसंत धोंडू खैरे हे ३१ मे रोजी हे आपले होमगार्ड समजदेशक त्याचप्रमाणे पाठबांधारे शिपाई हे सेवेतून निवृत्त झाले आहेत अशा माणगांव चा अजाण अवलियाला समस्त माणगांव करून मानाचा मुजरा करण्यात आला.