बारावीचा निकाल येत्या आठवड्यात

बारावीचा निकाल येत्या आठवड्यात

बारावीचा निकाल येत्या आठवड्यात
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन वर्षांनंतर प्रथमच ऑफलाईन घेण्यात आलेल्या बोर्ड परीक्षांच्या निकालाची उत्सूकता साऱ्यांनाच लागून राहिली आहे. दहावी, बारावीचे निकाल यंदा वेळेत लागण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल पुढील आठवड्यात ६ किंवा ७ जूनला लागणार असून, दहावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे वृत्त आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. दहावी आणि बारावीचे निकाल वेळेत लावण्याचा प्रयत्न आहे. पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल लागेल. दहावीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा आठवडाअखेर लागू शकेल, असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. दोन वर्षांनंतर प्रथमच राज्यात ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. मुलांचा अभ्यास ऑनलाईन झाला होता आणि परीक्षा मात्र ऑफलाईन झाल्याने निकाल कसा राहील, याविषयी पालक, शिक्षक, विद्यार्थी साऱ्यांनाच उत्सूकता आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकालांना ऑनलाइन बघता येईल. यासाठीची लिंक निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर शिक्षण मंडळाच्या https://mahahsscboard.in/ या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करुन दिली जाईल