आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त रेस्क्यु टीमच्या सदस्यांचे विमे काढण्याचा उपक्रम तर शिवसैनिकांकडून आमदार गोगावले वह्यांची भेट
📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻 *संदिप जाबडे*
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267
पोलादपूर(रायगड)- महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यामध्ये महाड विधानसभा मतदार संघात नैसर्गिक आपत्ती, अपघात अशा वेळी नेहमीच धावत येत स्वतःची जीवाची परवा न करत मदत कार्यासाठी धावणाऱ्या रेस्क्यू टीम च्या सदस्यांचे विमे काढून वेगळ्या पद्धतीने आमदार भरतशेठ गोगावले यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
त्यावेळी पोलादपूर तालुक्यातील नरवीर रेस्क्यू अँड एडवेंचर्स व महाड येथील साळुंके रेस्क्यू टीम च्या सदस्यांचे विमा उतरविण्यात आले. यावेळी युवासेना अधिकारी विकास गोगावले,माजी जि प सदस्या सुषमा गोगावले, साळुंके रेस्क्यू टीमचे प्रशांत साळुंखे व नरवीर रेस्क्यू टीमचे अध्यक्ष रामदास कळंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच आमदार भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना अधिकारी विकास शेठ गोगावले यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी आमदार गोगवलेंना वह्यांची भेट देखील यावेळी दिली.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी वाढदिवसानिमित्त राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण राज्यभरातून कौतुक होत आहे.