श्रीवर्धन कुटीर रुग्णालयातील डॉक्टरी पेशातला देवमाणूस सेवानिवृत्त.
✍ रशाद करदमे ✍
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 9075333540 📱
श्रीवर्धन : डॉक्टर, डॉक्टर म्हणजे रुग्णाला मरणाच्या दारातुन परत आणणारा माणूस रुपातील देव माणुस, देव हा माणसात शोधताना एक खास उदारण म्हणजे श्रीवर्धन सरकारी दवाखान्यातील डॉक्टर श्री. ढवळे सर. अत्यंत गरिब शेतकरी कुटुंबतुन जन्माला आलेले, परंतु कठोर परिश्रम घेवुन आपली डॉक्टर हि पदवी पूर्ण केली .तरी डॉक्टर या पेशाचा, जरा ही अभिमान न बाळगता, समाजाच्या प्रत्येक कार्यात भाग घेणे, प्रत्येक रुग्णाला आपला नातेवाईक किंवा सखा, भाऊ बहिने प्रमाणे धीर देवून त्यांचा पाठिशी उभे राहणे हे त्यांचा जणू धर्मच आहे. प्रस्तुती तज्ञ म्हणून ओळखावे जाणारे डॉक्टर साहेबांनी आज पर्यंत कित्येक मातांची प्रस्तुती व नवजात बालकांना जन्म देऊन नवीन आयुष्य दिले आहे. आज पर्यंत त्यांनी अकरा हजारा पेक्षा जास्त इतक्या सिझेरीयन शस्त्रक्रिया यशस्वी पणे पूर्ण केल्या. कित्येक खेड्या-पाड्यांतुन महिला डॉक्टरांनवर विश्वास ठेवुन प्रवृत्ती साठी -श्रीवर्धन कुटिर रुग्णालयात येत. कित्येक जिल्हात मधुन डॉक्टरांनी कुटुंब योजने सारख्या शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पूर्ण केल्या आहेत. याच कार्याची दखल घेऊन मा. सचिन आहेर साहेब माजी पालकमंत्री यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर ढवळे यांनी कधी कोणत्याही रुग्णामध्ये भेदभाव केला नाहि. रात्रं-दिवस प्रत्येक रुग्णाची सेवा करत आले. डॉक्टर वेशात असताना सुध्दा आपल्यातली माणुसकी कधीच कमी होऊ दिली नाही. गोर- गरिबांना अत्यंत मायेने व आपुलकी जवळ करून प्रसंगी, अर्थिक मदत केली. डॉक्टरांची प्रेमळ भाषा हेच जणु रुग्णांचे अर्धे औषध बनते. व उपचारातुन बरे झाल्यावर त्यांना अनेक अशिर्वाद देऊन जातात. अगदि साधी राहणी, उच्च विचार, प्रेमळ स्वभावाचे डॉ. ढवळे सर दि.३१ जून २०१२ रोजी आपल्या वयाच्या मानाने सेवा निवृत्त झाले. अशा या देवरूपी मानवास पुढील वाटचालीस शुभ खुप खुप शुभेच्छा.