चारित्र्याच्या संशयावरून पती उपाशी ठेवायचा, महिलेची आत्महत्या

58

चारित्र्याच्या संशयावरून पती उपाशी ठेवायचा, महिलेची आत्महत्या

पुणे :- दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ करत तिच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी वारजे माळवाडीत घडली.

रमेश नारायण कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनिषा रमेश कदम (रा. वारजे माळवाडी)असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा आणि रमेशचा काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर रमेश दारू पिऊन मनिषाला शिवीगाळ करून मारहाण करत होता. त्यानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला उपाशी ठेऊन नांदविण्यास नकार दिल्यामुळे छळास कंटाळून मनिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनिषा कथले तपास करीत आहेत.