ट्रकच्या धडकेत महिला पोलिस जागीच ठार आयशर चालक वाहनासह फरार

ट्रकच्या धडकेत महिला पोलिस जागीच ठार
आयशर चालक वाहनासह फरार

ट्रकच्या धडकेत महिला पोलिस जागीच ठार आयशर चालक वाहनासह फरार
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

बल्लारपूर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस मोनल मेश्राम ह्यांच्या दुचाकीला राजुरा येथे मुख्य महामार्गावर मागुन येणाऱ्या आयशर वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी 6:40 वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार महिला पोलिस मोनल ह्या आपले कर्तव्य बजावून MH34AT 1877 क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने बल्लारपूर येथुन राजुरा येथे आपल्या राहत्या घरी परत येत असताना मागाहून येणाऱ्या MH 29BE4158 क्रमांकाच्या आयशर ट्रक ने धडक दिली. धडक बसताच त्या आपल्या मायस्ट्रो दुचाकीवरील ताबा सुटल्याने खाली कोसळल्या व डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती विलास बनकर व दोन लहान मुले आहेत.