तंबाखू कारखान्यावर धाड, आठ जणांना अटक

तंबाखू कारखान्यावर धाड, आठ जणांना अटक

तंबाखू कारखान्यावर धाड, आठ जणांना अटक
🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
📞 8830857351

चंद्रपूर: सिंदेवाही तालुक्यातील तळोधी बाळापूर जवळील वलनी येथील सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधित तंबाखू च्या बनावट कारखान्यावर धाट टाकून तब्बल २५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. सलमान आरीफ कासमानी, सागर तेजराम सतीमेश्राम, रोहीत माणिक धारणे, वैभव प्रभाकर करकाडे, सागर संजय गजभिये, वैभव भास्कर भोयर, मयुर सुरेश चाचेरे, खेमराज विलास चटारे असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. सिंदेवाही तालुक्यातील तळोधी बाळापूर जवळील वलनीयेथील सचिन वैद्य यांच्या फार्महाऊसवर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणून मशिनद्वारे भेसळ करुन मजा डब्यात सीलबंद करून विकत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संदिप कापडे, पोलिस उप निरीक्षक अतुल कावळे यांच्या पथकाने धाड टाकली असता, मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व आठ इसम आढळून आले. हुक्का, ईगल, मजा सुगंधित तंबाखू एकूण ९९० किलो ८०० ग्रॅम, तंबाखू बनविण्यासाठी मशिन, वजन काटा, लेबल मशिन, बारकोड मशिन, तंबाखू वाहतुकीसाठी चारचाकी वाहन तसेच आठ मोबाईल संच असा एकूण २५ लाख ७१ हजार ५५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची तस्करी केली जात असून अवैध मार्गाने याची विक्री केली जात आहे. यापूर्वी सुध्दा स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात धाड टाकून वसीम नामक इसमाचा सुगंधित तंबाखूचा कारखाना बंद केला होता. या कारवाईनंतर स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषण प्रशासन कोमात गेली होती. मात्र, गुरूवारी रात्री सुगंधित तंबाखूविरूध्द गुन्हे शाखेने मोठी कारवाई केल्याने जिल्ह्यात अवैध सुगंधित तंबाखू विक्रीला आळा बसण्याची शक्यता आहे.