नागभिड तालुक्यातील वलनी येथे 25 लाख 71हजार 550रुपयाचा बनावट सुगंधित तंबाखू मुद्दे मालसह जप्त
गुन्हे शाखेच्या पथकाकडून सर्वात मोठी कारवाई
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड— नागभीड तालुक्यातील तळोधी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी येथे सचिन वैद्य याच्या फार्म हाऊस वर गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारला सुमारे 4.30 वाजेच्या दरम्यान छापा मारून 25 लाख 71 हजार पाचशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
फार्म हाऊस वर ठिकाणी, सुगंधित तंबाखू, मशीन, इलेक्ट्रिक काटा, खाली खोके, ईगल व मजा तंबाखू नावाच्या प्रिंटेड पिशव्या, मिक्सर मशीन, दालचिनी, रंग, मेंथोल, इलेक्ट्रिक प्रेस, थिनर, कच्ची तंबाखू, अशा प्रकारच्या विविध वस्तू घटनास्थळी आढळून आल्या.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप काकडे,पी. एस. आय. अतुल कावळे, आणि इतर सहकाऱ्यांनी कामगिरी केली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकण्यात आले.
आरमोरी येथील आरोपी सलमान आशिकभाई कासवाणी व त्या ठिकाणी काम करत असलेले 7 मजूर यांचेवर कलम 328, 420, 468, 472, 272, 273, 188, भा.द. वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. व अन्न सुरक्षा अधिनियम 2006 कलम 59 प्रमाणे कारवाई करण्यात आली.
तळोधी पोलिस स्टेशनचे ठाणेदार दिवाकर शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पि. एस. आय. आकाश साखरे पुढील तपास करीत आहेत
नागभीड तालुक्यातील काहीक किराणा दुकाणात सुद्धा बनावट सुगंधित तंबाखू चा मोठा व्यापार काही किराणा दुकानातून होत असते. पण त्या दुकानावर अजून पर्यंत एकही धाड पडली नाही आणि कोणत्याच प्रकारची कारवाही सुद्धा झाली नाही,अशी चर्चा वलणी येथे पडलेल्या छापा नंतर लोकांमध्ये रंगू लागली आहे.नागभीड मधून सुद्धा जवळ लगतच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुंगधित तंबाखूचा पुरवठा मोठ्या प्रमाणात केला जातो, सुगंधित तंबाखू चा करोडो रुपयांचा माल हा नागभीड येथील दुकानातून पुरवठा केला जात असल्याचे बोलल्या जाते,त्यांच्यावर सुद्धा कारवाही होणार का? अशी चर्चा नागभीड शहरात रंगू लागली आहे.या सुंगधीत तंबाकू मुळे अनेक खर्रा खाणारे शैकिनाचे तोंड ऊलत नसुन,उध्याॅपोटी जेवन करताणी उठावें लागते, 10 वर्षापासुन मुंलाना तसेच पुरुष–स्ञींयांना सुद्या खर्रा खाण्याचा शैंकिन,झाले आहे,लहान मुले या व्यवसाय कडे खर्रा विक्री करण्याचा छंद लागला आहे,यात दोषी कोण ॽ