ताम्हाणे घाटात स्कुटी व ट्रेलर चा अपघात, अपघातात दोघे जखमी
📰मंगेश मेस्त्री📰
निजामपूर विभाग प्रतिनिधी रायगड
📞99238 44308📞
माणगांव तालुक्यातील ताम्हाणे घाटात कोडेथर गावच्या हद्दीत स्कुटी व ट्रेलर मध्ये अपघात झाल्याची घटना काल दिनांक ३ जून रोजी रात्री १२.५० च्या दरम्यान घडली.
मिलालेल्या माहीतीनुसार सविस्तर वृत्त असं की माणगांव पुणे महामार्गावर ताम्हिणी घाटात कोडेथर गावाच्या हद्दीत मंगळवारी मध्यरात्री फिर्यादी एम एच १२ जे ६५६१ स्कुटी घेऊन विले बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना विले भागाड औदयोगिक क्षेत्राकडे येणाऱ्या ट्रेलर एम एच ४६ एए फ ७६२९ ची स्कुटी ला धडक बसली यात निलेश याच्यासह अन्य एक जण जखमी झाला आहे.
अपघातानंतर ट्रेलर चालक ट्रेलरसह फरार झाल्याची घटना घडली आहे अधिक तपास येतील पोलीस ठाण्याचे हवालदार थोरवे हे करीत आहेत.