मुंबई – गोवा महामार्गावर शहरानजीक केंबुर्ली गावाच्या हद्दीत
कारची एस.टी.ला धडक
पाच जखमी, दोन चिंताजनक
✍रेश्मा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
8600942580
महाड :- शनिवारी सांयकाळी पाच वाजणेच्या दरम्यान शहरानजिक मुंबई गोवा महामार्गावर केंबुर्ली गावानजिक एक कार एस.टी. बसवर आदळून झालेल्या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती शहर पोलिस सूत्रांनी दिली असून या अपघातामुळ सर्वत्र हळहळ व्यक्त होत आह सर्व जखमी एकाच
कुटुंबातील आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यात एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.
आज सायंकाळी एम एच ०२० बीएल ३२२६ या क्रमांकाची एस .टी. बस मुंबईकडून महाडकडे येत असताना केंबुर्ली नजिक रत्नागिरीकडून मुंबईकडे जाणारी एमएच ०१ बीयू ३८११ या क्रमांकाची कार चुकीच्या दिशेने जात या बसवर आदळली. या अपघातात कारचालक सचिन लिगम (वय ३८), सानिका लिगम (वय ३५), आराध्य लिगम (८) , अथर्व लिगम (वय १३ ) आणि गुणाजी लिगम ( वय ७५ ) हे पाचजण जखमी झाले. यापैकी सानिका लिगम आणि आराध्य लिगम हे गंभीर असून त्यांना मुबई येथे हलविण्यात आले आहे. लिगम कुटुंब हे रत्नागिरी जिल्ह्यातील हसोळ येथे रहिवासी असून ते मुंबईत वास्तव्याला आहे.
अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मिलींद खोपडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक मोकळी केली.