हिंगणघाट अनोळखी इसामाचा कोरोना मुळे मृत्यु. ओळख पटण्याकरिता पोलिसाची पायपीठ.
कोरोना वायरस 19 विषाणु आजाराने मरण पावलेल्या एक अनोळखी इसामाचे प्रेत उप जिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे पडून असुन त्याची ओळख पटवण्याकरिता हिंगणघाट पोलिसांना करावी लागत आहे पायपिठ
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
हिंगणघाट:- मधिल मुजुमदार वार्डतील कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरातील खाली जागेत, उंची 5 फुट 5 इंच, रंग गोरा बारीक दाढी, अंगात निळ्या रंगाचे त्यावर पांढ-या रंगाचे ठीपके असलेले फुल शर्ट, आत मध्ये पांढ-या रंगाची शँन्दो बनियान घातलेला एक 60 वर्षाचा जवळ पास वयाचा एक अनोळखी पुरुष पडून असल्याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला फ़ोन द्वारा मिळाली. हिंगणघाट पोलिस कर्मचा-यांनी त्या अनोळखी इसामाला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
त्या अनोळखी इसामाच्या प्राथमिक उपचार करुन, त्याची कोरोना कोविद 19 ची संसर्ग आजारा बाबद चाचणी केली असता, सदर इसाम हा कोरोना वायरस पॉजिटिव्ह निघला असता, त्याचा इलाज सुरु करण्यात आला. 28 नोव्हे ला इलाज सुरु असतांना तो कोरोना वायरसच्या विषाणूच्या संसर्गाने रुग्णालयात मरण पावला असल्याचे उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट यांची 28 नोव्हे लेखी तक्रार आल्याने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे मर्ग क्रमांक 133/2020 कलम 174 जा. फौ ची नोंद करण्यात आली. सदर मर्गचा प्राथमिक तपास पोलिस हवालदार बंडू महाकाळकर हे करीत आहे.