माणगाव वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे ट्रक चालकाचे वाचले प्राण..!
दिपक दपके
माणगांव शहर प्रतिनिधी
9271723603
मिळालेल्या माहितीनुसार
गुरुवार दिनांक 4 जून 2022 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली , ट्रक नंबर GJ 13 W 0108 हा मुंबई गोवा महामार्गावर महाड बाजू कडून मुंबईच्या दिशेने जात असताना माणगाव नजीक तीनबत्ती नाका येथे ट्रक चालकाला गाडी चालवत असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले व चक्कर येऊन ट्रक मध्येच बेशुद्ध पडला व ट्रक रोडच्या बाजूला जाऊन थांबला म्हणून मोठा अनर्थ होण्यापासून टळला ,त्या ठिकाणी असणाऱ्या स्थानिक रहिवाशांनी ड्युटी वर असणाऱ्या ट्राफिक पोलिसांना कॉल करून माहिती दिली तेव्हा माणगाव वाहतूक शाखेचे कर्तव्यावर असणारे पोलीस अंमलदार सफौ. अनिल महाडिक, पोकॉ.लालासाहेब वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक चालकाला माणगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. व त्याची विचारपूस करून त्याच्या मालकाला फोन वरून सदर घटने बाबत माहिती देण्यात आली व आता चालकाची प्रकृती स्थिर आहे.सदर कामगिरी बद्दल माणगाव वाहतूक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.