अपघातात जखमी झालेल्या दिपकला न्याय मिळावा, सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर याची मागणी

अपघातात जखमी झालेल्या दिपकला न्याय मिळावा, सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर याची मागणी

अपघातात जखमी झालेल्या दिपकला न्याय मिळावा, सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर याची मागणी

मंगेश मेस्त्री निजामपूर विभाग प्रतिनिधी 99238 44308

माणगांव तालुक्यातील पोस्को कंपनीमध्ये शुभम राजे इंटरपप्रायजेस नावाच्या कॉन्टॅक्टमध्ये दिपक कदम नावाचा कामगार काम करीत असताना त्याचा अपघातात झालं.त्या अपघातात दिपक कदम हा ८०% भाजला आहे.त्याला ऐरोली सरकार बम्स हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केल आहे यावेळेस कपंनी ने पोलिसांना याबाबत कोणतेही माहिती न देता त्याला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये दाखल केल आहे हा कपंनी ने केलेला गुन्हा असल्याने कपंनीवर आणि संबंधितावर गुन्हा दाखल करून पीडित जखमी दिपक कदम याला न्याय मिळावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

पीडित जखमी दिपक कदम याला न्याय मिळावा हा उद्देश नजरेसमोर ठेवून सामाजिक कार्यकर्ते बाबुशेठ खानविलकर यांनी निजामपूर येथील आपल्या कार्यलयात दिनांक ८ जून रोजी पत्रकार परिषद घेऊन पोस्को कपंनी च्या मुजोड प्रशासनाविरोधात जोरदार आगपाखंड केली यावेळी ते म्हणाले माणगांव तालुक्यामध्ये मेगा प्रोजेक्ट म्हणून आज पॉस्को कपंनी च्या तिथे मोठे प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये बरेजसे कामगार काम करीत आहे वारंवार कामगारांना होणाऱ्या अन्यायाला समोरो जावं लागत या होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मी आंदोलन केली आहेत परंतु कपंनी ने कोणत्याही प्रकारची स्थानिकाची दखल घेतली नाही आहे ना कोणत्याही प्रकारचे सरक्षण आहे.

पिढीत जखमी दिपक कदम हा जवळपास ८०% भाजला असून त्याला मुंबई येतील ऐरोली सरकार बम्स हॉस्पिटल येते हळविण्यात आले आहे परंतु आज तिसरा दिवस उजडला असून कपंनी वर गुन्हा दाखल झालं नाही आहे कपंनी ने हा पहिला गुन्हा केला आहे दुसरा गुन्हा म्हणजे कपंनी कोणतेही संरक्षण न देता कामगारांनकडून काम करून घेत आहे हेच त्यात दिलेलं उदारण आहे.आज गुन्हा दाखल करायला गेलं तर कपंनी वर कलम ३०७ किंवा ३०२ गुन्हा होऊ शकतो कारण त्या पिढीत जखमी चे आज दोन्ही डोळे गेले आहेत. परंतु स्थानिक प्रशासन सुद्धा दूरलक्षित करीत आहे जर पोलिसांना ही कल्पना नसेल तर त्यांनी माझ्या पत्रकार परिषद च्या माध्यमातून दखल घ्यावी आणि कपंनीवर आणि संबंधित कॉन्टॅक्टवर ताबडतोब गुन्हा दाखल करावं अशी माझी प्रसार माध्यमातून प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे.