माणगाव ज्युनिअर कॉलेजच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम

माणगाव ज्युनिअर कॉलेजच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम

माणगाव ज्युनिअर कॉलेजच्या उत्तुंग यशाची परंपरा कायम

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेज माणगाव जिल्हा रायगड या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखली. एच एस सी परीक्षा मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला आहे. कुमारी शेठ तेजस्विनी सचिन हिने 88. 33 % गुण मिळवून कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला , कुमारी टेंबे अर्पिता महिपत हिने विज्ञान शाखेत 85. 83 % मार्क मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी येलवे संस्कृती विशाल हिने 85 .33 % गुण मिळवून विज्ञान शाखेत तृतीय क्रमांक मिळविला तर कुमारी अनुष्का प्रशांत साबळे हिने 84 83 % गुण मिळवून चतुर्थ क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेचा निकाल देखील 100 % लागला असून कुमार सावंत मयांक गणेश याने 85.50 % गुण मिळवून प्रथम क्रमांक कुमारी गावडे दिपाली पांडुरंग हिने 83. 33 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर कुमारी पाटील प्रिया गणेश हिने 78. 50 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.
त्याच बरोबर कला शाखेचा निकाल देखील 97. 83 % लागला असून कुमारी वडेकर रिद्धी गणेश हिने 74.50 % गुण मिळवून प्रथम क्रमांक ,कुमार ठाकुर आशिष चिंतामण ह्याने 74. 17 % गुण मिळवून द्वितीय तर कुमारी धोत्रे अक्षय गोपीनाथ याने 71.17 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला
या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्री राजीवजी साबळे ,सेक्रेटरी श्री कृष्णाभाई गांधी, स्कूल कमिटी चेअरमन श्री.राजन भाई मेथा, प्राचार्य श्री.ढमाल सर, उपमुख्याध्यापक श्री. डी.एम.जाधव सर तसेच पर्यवेक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.