गोंडपीपरी येथिल अनिल पेंढारकर यांच्या राहत्या घरी जननायक बिरसा मुंडा स्मृती दिन सपन्न

गोंडपीपरी येथिल अनिल पेंढारकर यांच्या राहत्या घरी जननायक बिरसा मुंडा स्मृती दिन सपन्न

गोंडपीपरी येथिल अनिल पेंढारकर यांच्या राहत्या घरी जननायक बिरसा मुंडा स्मृती दिन सपन्न

शरद कुकूडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी
मो.नं.9518727596

गोंडपिपरी :- आज दि.09 जून रोज गुरवारला गोंडपीपरी येथिल अनिल पेंढारकर यांचे राहते घरी जननायक बिरसा मुंडा यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष खर्डीवार सा.बां. विभाग गोंडपिपरी,
प्रमुख अतिथी, म्हणून सुरेश पेंढारकर माजी प्राचार्य जनता वि. धाबा,
हिराजी कनाके,
इंद्रपाल मडावी,
अनिल पेंढारकर,
प्रणिता उईके,
पेंदाम, बी.आर.सी.गोंडपिपरी
इसटाम , बी.आर.सी गोंडपिपरी यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

महान आदिवासी क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृती प्रित्यर्थ कार्य.अध्यक्ष,प्रमुख अतिथी आणि उपस्थित यासह आदिवासी समाज बांधव यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मालर्पण करून, अभिवादन करण्यात आले.
सुरेश पेंढारकर सर यांनी भगवान बिरसा मुंडा यांनी देशासाठी आणि आदिवासी समाजासाठी केलेले महान कार्याची महती सांगताना म्हणाले की,आदिवासी समाजाला सन्मानाने जगता यावे,आदिवासींचे पारंपारिक अधिकार मिळावे त्याच्या उत्थानासाठी, त्यांचे शोषण थांबवावे,यासाठी बिरसा मुंडानी महान सेनानी ,या देशासाठी आदिवासी समाजासाठी ते अगदी तरुण वयात कार्य करताना ते शहीद झाले. त्यांचे हे कार्य वर्तमान काळात भविष्य काळात येणाऱ्या नवीन पिढीने त्यांचे इतिहास वाचन करावे ,आणि तशी वाटचाल करावी .आदिवासी क्रांतिकारकांनी देशासाठी, आदिवासी समाजासाठी जे कार्य केले, त्याचा विसर पडू नये म्हणून जयंती, पुण्यतिथी असे उपक्रम सुरू ठेवावे आणि शैक्षणिक क्रांती घडवून मानवी आपला आणि समाजाचा विकास करावा,असे आदिवासी कर्मचारी, तरुण पिढी यांना आव्हान दिले.
बऱ्याच वक्त्यांनी जननायक बिरसा मुंडा याच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक-
.इंद्रपाल मडावी
सुत्रसंचलन-श्री.हिराजी कनाके तर आभार प्रदर्शन -श्री.अनिल पेंढारकर यांनी केलेरेया कार्यक्रमाच्या निमित्ताने मा.अनिल पेंढारकर सर यांचे चिरंजीव इ.12वी परीक्षेत 90% गुण संपादन करून ते उत्तीर्ण झाले.