महाडमधील पूरग्रस्तांना विमा कवच मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भर पावसात उपोषण 

रेश्मा माने
महाड शहर प्रतिनिधी
मो. न. – ८६००९४२५८०

सावित्री नदीचा गाळ काढून मुंबई गोवा हायवे वर गाळ टाकण्यात आलेला आहे. यात पूरग्रस्तांना विमा कवच मिळालेला नाही तो विमा कवच मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भर पावसात उपोषण केले जाईल. बहुजनाच्या न्याय हक्कासाठी वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आलेली आहे. असे वंचित बहुजन आघाडीच्या रायगड जिल्हा भव्य कार्यकर्ता संवाद मेळाव्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आपल्या अध्यक्षीय भाषणात दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधीना बेरोजगारी औद्योगिकीकरण या संदर्भात विधान सभेत बोलता तर त्यांनी इकडे येऊन बसावे व आम्हाला तिकडे पाठवावे. सर्वांनी एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे काम केले पाहिजे. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ सोनावणे, अशोक जाधव, जिल्हा चिटणीस हर्शल कांबळे, महाड संवर्धन समितीचे प्रमुख कांबळे सर,शहर अध्यक्ष सोनू कासारे, जिल्हा उपाध्यक्ष कुंदन हाटे, जिल्हा महिला अध्यक्षा मोहिनी शिर्के व प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरवात महाड शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांना व चवदार तळे येते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. महाड मधील प्रमुख मागण्यांचे निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार सुरेश काशीद यांना देण्यात आले. सर्व कार्यकर्त्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन जिल्हा सरचिटणीस सागर भालेराव यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here