देवळी गावात माती परीक्षणावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

55

देवळी गावात माती परीक्षणावर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती

धनराज आर. वैरागडे

मो.न: 9421527972

गडचिरोली उपजिल्हा प्रतिनिधी

चामोर्शी : केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी येथील ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजनेतील विद्यार्थ्यांतर्फे 5 जून २०२२ ला देवळी,तालुका – चामोर्शी, जिल्हा- गडचिरोली येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थांनी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम व कृषी औद्योगिक जोड 2022-23 या अनुषंगाने शेतकऱ्यांना माती परीक्षणा बाबत माहिती दिली.

विद्यार्थांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाउन माती परीक्षण कसे फायदेशीर आहे व त्यासाठी अचूक नमुना कसा घेतला पाहिजे,याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डॉ. आदित्य कदम तसेच श्री. छबिल दुधबळे प्रमुख उद्योजकता जागृती विकास योजना, श्री. उत्तम चरडे सह.प्रभारी, श्रीमती. उषा गजभीये कार्यक्रम अधिकारी प्रा. भोजराज कुमरे , यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सोनु अमृतकर, श्रुती गावातुरे, व रोहीनी बोरुटकर, व त्याच बरोबर येथील शेतकरी रामदास बरसागडे, सुरेश नैताम व देवळी गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.