जोगेश्वरीत विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर संपन्न

48

जोगेश्वरीत विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबीर संपन्न 

 

पूनम पाटगावे

जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी 

मो.नं. ८१४९७३४३८५

जोगेश्वरी:- मागील दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढलेला होता. पण मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारनेही सर्व गोष्टींवरील निर्बंध मागे घेतले. कोरोनाच्या लसीकरण मोहीम वाढवल्या. त्यामुळे रुग्णसंख्या देखील कमी होऊ लागली. पण गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत येत आहे. कोरोना विषाणूचा धोका शाळकरी विद्यार्थ्यांना व अबालवृद्धांना जास्त प्रमाणात आहे. शाळा सुरु होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. शाळा सुरु होण्याचा अवधी लक्षात घेता आजगावकर आरोग्य केंद्र, जोगेश्वरी यांच्यामार्फत वय वर्ष १२ ते १७ वयोगटातील विद्यार्थी मित्र मैत्रिणीसाठी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच यासोबत ६० वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी तिसरा बुस्टर डोस आणि १८ वर्षावरील नागरीकांसाठी पहिला व दुसरा डोस देखील देण्याचे आयोजन केले गेले. 

 सदर कोविड लसीकरण शिबीर आज शुक्रवार दिनांक १० जून २०२२ रोजी नित्यानंद सेवा मंडळ, आनंद नगर येथे सकाळी ११ ते १ या वेळेत घेण्यात आले. या शिबिरांतर्गत १२ ते १४ वर्ष या वयोगटातील ४० विद्यार्थ्यांना कॉर्बेवॅक्स लस देण्यात आली. १५ ते १७ वर्ष या वयोगटातील १३ विद्यार्थ्यांना कोवॅक्सिन लस देण्यात आली. ६० वर्षावरील २२ ज्येष्ठ नागरिकांना तिसरा बुस्टर डोस देण्यात आला. या कोविड लसीकरण शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतला.