नागपूर बहिणीची छेड काढल्याचा विचारला जाब, भावावर चाकूहल्ला.

68

नागपूर बहिणीची छेड काढल्याचा विचारला जाब, भावावर चाकूहल्ला.

घरात एकट्या असलेल्या 14 वर्षीय बहिणीची छेड काढल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील पाचपावली परिसरात घडली. हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले.

 
पल्लवी मेश्राम
नागपूर :- बहिणीची छेड काढल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर चाकूहल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही थरारक घटना पाचपावलीतील कुऱ्हाडकरपेठ येथे सोमवारी रात्री घडली.
रोहित वय 17 हे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी भरत महेश बुरडे व त्याचा भाऊ शुभम बुरडे या दोघांविरूद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी रोहित व त्याची आई कामानिमित्त बाहेर गेले. त्याची 14 वर्षीय बहीण घरी एकटी होती.

शुभम व भरत रोहितच्या घरात घुसले. छेड काढून रोहितच्या बहिणीला पाणी प्यायला मागितले. रात्री रोहित व त्याची आई घरी परतली. दोघांनी छेड काढल्याचे मुलीने आईला सांगितले. रोहित दोघांना जाब विचारायला गेला. याचदरम्यान शुभम याने रोहित याला मारहाण केली. भरत याने त्याच्या पोटात चाकू खुपसला व दोघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पेालिस तेथे पोहोचले. जखमीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांचा शोध सुरू केला आहे.