राज्यात पुढचे पाच दिवस मुसळधार कोकणाला सतर्कतेचा इशारा
संतोष हिरवे मुरुड तालुका प्रतिनिधी ९३२६१९१६८६
मुरुड :- येत्या ४८ तासात कोकणातील उर्वरित भाग आणि मध्य महाराष्ट्रतील काही ठिकाणी मान्सूनची वाटचाल होण्यास अनुकूल स्थिती आहे. अशी माहिती प्रादेशिक हवामान विभाग केंद्र मुंबई याच्यावतीने देण्यात आली आहे.
हवामान विभागाने ११ जून ते १५ जून पर्यंतचे हवामानाचे इशारे जारी केले आहेत त्यानुसार पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता असून ११ जून रोजी रायगड रत्नागिरी सिधुदुर्ग या जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे कोकणला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.