महाडमध्ये नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुस्लिम समाजाचे निदर्श

महाडमध्ये नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुस्लिम समाजाचे निदर्श

महाडमध्ये नुपुर शर्मा यांच्याविरोधात मुस्लिम समाजाचे निदर्श

✍ रेश्मा माने ✍

महाड शहर प्रतिनिधी
8600942580

महाड : -भाजपच्या महिला प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर ठिकठिकाणी मुस्लिम समाजाने संताप व्यक्त केला. महाडमध्ये देखील आज मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करून महाड तहसीलदार यांना निवेदन दिले.
महाडमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आज सकाळी निदर्शने करण्यात आली. तालुक्यातील मुस्लिम समाजाने एकत्रित येत मोर्चाचे आयोजन केले होते. शहरातून हा मोर्चा शांततेत महाड तहसील कचेरीवर नेण्यात आला. याठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीने महाड तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मुस्लीम समाजाचे इनायत देशमुख, माजी नगराध्यक्ष मेहबूब कडवेकर, अयुब चिचकर, रेहान देशमुख, महंमदअली पल्लवकर, अकबर तरे, सत्तार तरे, इब्राहीम झमाने, अकबर ताज, मन्सूर ताज, शौकत इसाने, रफिक पुरकर, सामाजिक कार्यकर्ते मुबीन देशमुख आदी नेते आणि जमातीचे अध्यक्ष, प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी महाड तहसीलदार सुरेश काशीद यांना निवेदन सादर करण्यात आले. देण्यात आलेल्या निवेदनानुसार नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.