चॅम्पियन्स कराटे क्लब माणगांव शाखेचा उद्‌घाटन सोहळा संपन्न :

चॅम्पियन्स कराटे क्लब माणगांव शाखेचा उद्‌घाटन सोहळा संपन्न :

चॅम्पियन्स कराटे क्लब माणगांव शाखेचा उद्‌घाटन सोहळा संपन्न :

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१

माणगांव : – माणगांव, महाड , श्रीवर्धन , पोलादपूर ,म्हसळा , सातारा , मालाड या शाखांनंतर ‘ चॅम्पियन्स कराटे क्लब ‘ ची शाखा आता माणगांव येथेही सुरु झाली आहे . प्रशिक्षक कु . तन्वी माने ही माणगांव शाखा चालविणार आहे .

माणगांव शाखेचा उद्घाटन सोहळा दि .८ जून २०२२ रोजी माणगांव येथील कुणबी समाज मंदिर हॉल येथे पार पडला. त्याआधी कार्यक्रमाचे उद्घाटक करताना माणगांवचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या हस्ते फीत कापून बामणोली रोडवरील क्लासचे उद्‌घाटन करण्यात आले.त्यानंतर कुणबी समाज मंदिर हाँल येथे कराटेच्या प्रात्यक्षिकांसह शुभारंभाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .चॅमियन्स कराटे क्लबचे महाराष्ट्र राज्य मुख्य प्रशिक्षक प्रसाद सावंत यांनी कराटे या क्रिडा प्रकारा बद्दल तसेच क्लबच्या आजपर्यंतच्या कामगिरीबददल सविस्तर माहीती  दिली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे.चंद्रशेखर देशमुख,चेअरमन इंदापूर यांनी यावेळी बोलताना शारीरीक ताकदी बरोबरच मानसिक शक्ती वाढवण्यासाठी कराटे सारख्या क्रिडा प्रकारांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे अध्यक्ष व माणगांव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष.ज्ञानदेव पवार यांनी कराटे खेळासाठी जी शक्य असेल ती मदत करणार असल्याचे आश्वासन दिले .

या कार्यक्रमास नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार ,चंद्रशेखर देशमुख शिक्षण संस्थेचे चेअरमन.चंद्रशेखर देशमुख , माणगांव तालुका भाजप अध्यक्षा.अश्विनी महाडीक, चॅम्पियन्स कराटे क्लब चे राज्य प्रशिक्षक . प्रसाद सावंत ‘ माणगांव शाखेची प्रशिक्षक कु .तन्वी माने ,नायब तहसीलदार सौ . अनुराधा माने , नायब तहसीलदार .संजय माने तसेच माणगांव शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते .

(चँम्पियन्स कराटे क्लबचे उद्घाटन करताना नगाराध्यक्ष ज्ञानदेव पवार,चंद्रशेखर देशमुख दिसत असून कराटे प्रशिक्षण करताना तरूण तरूणी दिसत आहेत.