महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा मनमानी कारभार जलप्रदूषणासह COVID19 च्या कांड्या नदीपात्रात
✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९
महाड(रायगड):- महाड एमआयडीसी हद्दीतील मौजे देशमुख कांबळे स्मशानभूमी जवळील असणाऱ्या नदीपात्रात पुन्हा सांडपाणी सोडल्याचे आढळून आले असता देशमुख कांबळे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. टी.एस.देशमुख यांनी पत्रकार श्री. किशोर किर्वे, नितेश लोखंडे, समिऊल्ला पठाण यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता भयावह परिस्थिती समोर आली नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी त्याचबरोबर COVID 19 टेस्टसाठी वापरण्यात येणाऱ्या कांड्याचा साठा त्याठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र, एमआयडीसीसह, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्याजवळ संपर्क साधून घटनास्थळी बोलावण्यात आले व तेथील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले संबंधित अधिकारी यांना कारवाई संदर्भात विचारणा केली असता धक्कादायक उत्तर समोर आले की नियमांचे उल्लंघन व बेजबाबदार कारखान्यांवर कारवाई करण्यास आम्हाला वरिष्ठांकडून अधिकार दिलेले नसून काही बंधने आमच्यावर लादली गेली आहेत आमच्याकडून अनेक कारखान्यांवर कारवाई करण्यासंदर्भात प्रस्ताव गेलेले आहेत परंतु अद्याप वरिष्ठांकडून कोणताही आदेश दिला गेला नाही यामुळे वारंवार आमचा नाईलाज होत आहे अशाप्रकारे सत्य समोर आले असून येथील जनतेला मुजोर कारखान्यांच्या दावणीला बांधून आपली तिजोरी भरण्याचे काम वरिष्ठ अधिकारी करीत आहेत वारंवार होणाऱ्या वायु प्रदुषण, जल प्रदुषण यापासून उद्भवणाऱ्या आजारांना येथील नागरिक बळी पडत असताना सुद्धा अधिकाऱ्यांना काही देणेघेणे नाही नागरिकांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या कारखाने व अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी टी.एस.देशमुख व नागरिकांमधून केली जात आहे