मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, अल्पवयीन मुलीला पळविले

49

मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, अल्पवयीन मुलीला पळविले

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत आराेपीने तिला पळवून नेले. ही घटना कुही पाेलीस ठाण्यांतर्गत येथे.

नागपूर:- अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत आराेपीने तिला पळवून नेले. ही घटना कुही पाेलीस ठाण्यांतर्गतच्या अकाेली येथे साेमवारी दि.३० घडली. मुलीचे कुटुंबीय कामावर गेले असता, आराेपी चिराग मेश्राम २५, रा. भांडेवाडी, नागपूर याने मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत, लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. याबाबत मुलीच्या आईने पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि कलम ३६३ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, आराेपीचा शाेध सुरू केला आहे. पुढील तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक तकीत करीत आहेत.