खातखेडा येथे आदिवासी गोवारी शहिदांना श्रद्धांजली.
प्रा. अक्षय पेटकर प्रतिनिधी
वर्धा / देवळी :- २३ नोव्हेंबर रोजी खातखेडा ता. देवळी जिल्हा वर्धा येथे आदिवासी गोवारी समाज संघटना खातखेडाच्या वतीने ११४ गोवारी शहिदांना विभागीय अध्यक्ष शेतकरी संघटना माहिती व तंत्रज्ञान आघाडी पुर्व विदर्भ सचिन डाफे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाला माजी पोलीस पाटील रुपरावजी राऊत, दिनेश कौराती, विनोद नेहारे, शेतकरी संघटना युवा आघाडी पुलगाव विभाग अध्यक्ष प्रफुल झाडे , विजुभाऊ राऊत व किसना चाहारे उपस्थित होते.. यावेळी २६ वर्षाच्या प्रदिर्घ लढ्यानंतरही गोवारी समाजाला न्याय मिळाला नसुन ११४ शहिद बांधवांच्या स्मृतीस वंदन करून आपल्या न्याय मांगण्यासाठी पेटुन उठण्याचे आवाहन सचिन डाफे यांनी गोवारी समाज बांधवांना केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पप्पु राऊत, प्रमोद वाघाडे, नरेश वाघाडे, अमर वाघाडे, पवन नेहारे, रामु राऊत व गावातील अन्य कार्यकऱ्यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.