नागभीड तालुक्यातील पाणलोट सचिवांचे आमरण उपोषण सध्या स्थगीत.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड–तालुका कृषी अधिकारी नागभीड जि.चंद्रपुर येथे आज दि13/6/2022 सोमवारला झालेल्या बैठकीमध्ये मा.जिल्हा अधिक्षक कृषी चंद्रपुर यांनी मा.खंडाळे साहेब तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी,मा.मेंढे साहेब,पोलीस निरीक्षक पो.स्टे.नागभीड,मा.होमदेव मेश्राम जिल्हाध्यक्ष पाणलोट संघटना चंद्रपुर,कावळे साहेब,पाकमोडे साहेब,दाळगे,व इतर कर्मचारी यांचे समक्ष भ्रमणध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर व त्यांनी तालुका कृषी अधिकारी ब्रम्हपुरी यांना बैठकीला नागभीड येथे उपस्थित राहण्याच्या सुचनेवरुन व लेखी स्वरूपाचे दि.16/6/2022 ला दुपारी 2.00 वाजता पाणलोट सचिवाचे मानधना संबधी चर्चा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सर्व पाणलोट सचिवाचे संमंत्तीने उद्यापासून आयोजीत आमरण उपोषणास तात्पुरती स्थगीती देण्यात आलेली आहे.
यावेळी नागभीड पोलीस स्टेशनचे कर्मचारी गोवर्धन साहेब,वारजुरकर साहेब, पाणलोट समित्यांचे सचिव रज्जुताई पर्वते,राखीताई मदनकर,धृवबाळ बावनकुळे,जिवन शेंडे,डार्विन साहारे,छत्रपती नेवारे, प्रकाश मेश्राम,देवानंद नरुके,सुशील उईके,अंज्युता गेडाम, सुनील कामडी,सुरेश सोनवाणे,होमदेव ठाकरे व तालुक्यातील संपूर्ण पाणलोट सचिव उपस्थित होते.