प्राथमिक आरोग्य केंद्र जिते अंतर्गत दादर सागरी पोलीसांची आरोग्य तपासणी.
ब्लड प्रेशर, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, रक्त तपासगीमध्ये थॉयरॉईड, किडनी टेस्ट, लिव्हर टेस्ट, शुगर टेस्ट, सी.बी.सी या सर्वांची आवश्यक तपासणी.
सचिन पवार
माणगांव तालुका प्रतिनिधी
८०८००९२३०१
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिते अंतर्गत दादर सागरी पोलीस स्टेशन जोहे येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
यामध्ये सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली.
यामध्ये ब्लड प्रेशर, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, रक्त तपासगीमध्ये थॉयरॉईड, किडनी टेस्ट, लिव्हर टेस्ट, शुगर टेस्ट, सी.बी.सी या सर्व आवश्यक असलेल्या टेस्ट महा लँबद्वारे करण्यात आल्या.
यावेळी दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंदराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यु बी म्हात्रे, संतोष पांडुळे, विकास पाटील यांनी सहकार्य केले.
या शिबिरात डॉ. दिक्षिता मोकल, डॉ. मिलिंद पाटील वैदयकिय अधिकारी, डॉ. रोहिणी इंगळे, विकास पाटील,दिक्षिता मोकल, डॉ. रोहिनी इंगले, उदय म्हात्रे, मनिषा भोंडवे लॅब टेक्नीशियन, सायली वाळेकर, आशा मोकल, संजीवनी मोकल – आशा स्वयंसेविका यांनी तपासणी केली.
तसेच यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र जिते अंतर्गत येणाऱ्या उपकेंदामध्ये एकूण ३० गावामध्ये संपूर्ण रक्त तपासणी व आरोग्य तपासणी राबविण्यात आल्या.