उपविभागीय अधिकारी श्री. प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पाटील व गट विकास अधिकारी, नायब तहसीलदार माणगाव यांच्या मध्यस्थीने रस्ता रोको आंदोलनाला स्थगिती

✒ दिपक दपके ✒
माणगाव शहर प्रतिनिधी
9271723603📞

दिनांक 16/06/2022 रोजी 11.00 वा. माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मौजे मोर्बा येथे माणगाव ते दिघी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करणे व रस्त्यालगतच्या गटारी खुल्या करून देणे याबाबत सदर ठेकेदारास पावसाळा आला तरी सदरील कामे पूर्ण करण्यात आलेली नाहीत व रस्त्यालगत असलेल्या गटारीचे काम पूर्ण न झाल्याने पावसाचे पाणी साचून धोका होण्याची शक्यता आहे. म्हणून मोरबा सरपंच व उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली मोर्बा येथील ग्रामस्थ माणगाव दिघी राष्ट्रीय महामार्ग मोर्बा येथे रस्ता रोको आंदोलन करणार होते.
परंतु मोर्बा चे ग्रामपंचायत सदस्य श्री इक्बाल हर्णेकर ग्रामसेवक श्री तरडे पंचायत समिती माणगाव गटविकास अधिकारी श्री. प्रभे नायब तहसीलदार श्री भाटकर पोलीस पाटील श्री धनसे शेतकरी श्री अब्दुल सत्तार बडे यांची मिटिंग घेऊन सदर मीटिंगमध्ये शेतकरी श्री बडे यांना आपण टाकलेली माती काढून पाणी जाण्यास मार्ग करून देतो असे सांगितले सदर वेळी प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्यांनी दाखविल्याप्रमाणे पाणी जाण्याचा मार्ग बांधलेल्या गटारी पूर्ण करून देण्याचे सांगितले त्यानुसार J.M म्हात्रे इनफास्ट्रक्चर हे त्यांचे कामकाज करणार आहेत सदर ठिकाणी मा. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. प्रवीण पाटील माणगाव विभाग माणगाव व पोनी श्री. पाटील यांनी सदर प्रकरण योग्य रीतीने हाताळून रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.