अनरद बारीजवळ दुचाकी स्कूटीला धडक; कंटेनर खाली आल्याने नातू अजोबा-जागीच ठार

अनरद बारीजवळ दुचाकी स्कूटीला धडक; कंटेनर खाली आल्याने नातू अजोबा-जागीच ठार

अनरद बारीजवळ दुचाकी स्कूटीला धडक; कंटेनर खाली आल्याने नातू अजोबा-जागीच ठार

शहादा तालुका प्रतिनिधी राहुल आगळे मोबाईल 9325534661

शहादा : – सारंखेडा भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने कंटेनर ला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरून येणाऱ्या स्कुटीला धडक दिल्याने स्कुटी वरील युवक व वयोवृद्ध आजोबा वाहनावरून खाली कोसळले तोच रस्त्यावरून भरधाव कंटेनर चे मागील चाक दोघांच्या डोक्यावरून चालून गेल्याने दोघे जागीच ठार झाले. शहादा तालुक्यातील अनरदबारी उमिया भोजनालय लगत महावीर कोल्ड स्टोरेज समोर सदरची दुर्दैवी घटना काल सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. अपघातात मयत झाल्याने नातू- आजोबा आहेत. तसेच यात समोरील दुचाकीस्वार देखील जखमी झाला आहे याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल जगदीश बडगुजर वय १९ व त्याचे आजोबा लक्ष्मण माधव बडगुजर वय ८५ हे दोघेजण स्कुटी (क्रमांक एमपी ४६ एम डब्ल्यू ०१७८) बोराडी कडून शहादाकडे येत होते अनरद बारी लागत जात दुचाकीवरून (एम एच १९ ए८६४९ )फेस येथील राहुल कैलास पाटील याने कंटेनर (क्र एम एच ४०वाय ९११३)या वाहनास ओव्हरटेक करीत असतांना स्कुटीला जोरदार धडक दिल्याने स्कुटी वरील स्वप्निलच्या ताबा सुटला. यामुळे स्कूटी वरील स्वप्निल बडगुजर व लक्ष्मण बडगुजर हे दोघेजण खाली कोसळले. यादरम्यान दोघे कंटेनरच्या मागील चाकात आल्याने दोघे जागीच ठार झाले. तसेच धडक देणारी दुचाकी देखील तीन ते चार वेळा पलटी घेतली. यात राहुल कैलास पाटील जखमी झाल्याने त्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे वृत्त समजताच सारंखेडा पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, साहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान कोळी, शहादा सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, पोलीस नाईक वंदन गिरासे, राजू वडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाहन चालक व किलीनर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे.या दरम्यान सारंखेडा पोलिसांनी घटनास्थळी तत्परता दाखवत मदत कार्य केले.