मोटारपंप चोरणारी टोळी गजाआड विठ्ठलवाडा येथील सात तर कोठारीतील दोघे अटकेत

मोटारपंप चोरणारी टोळी गजाआड
विठ्ठलवाडा येथील सात तर कोठारीतील दोघे अटकेत

मोटारपंप चोरणारी टोळी गजाआड विठ्ठलवाडा येथील सात तर कोठारीतील दोघे अटकेत

शरद कुकूडकार
गोंडपिपरी शहर प्रतिनिधी‌‌‌
मो.न.9518727596

गोंडपीपरी:- सध्या खरीप हंगामाचे दिवस आलेले असून बळीराजा आपल्या शेतीच्या मशागतीसाठी कामात लागलेला आहे शेतीची मशागत करुन ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे शेतकरी आपल्या शेतीतील विहिरीमध्ये मोटर पंप बसवून पाण्याचे साधन उपलब्ध करून पीक घेत असतात. मात्र तालुक्यात काही दिवसापासून
शेतकऱ्यांच्या शेतातून आणि नदी पात्रात ठेवलेल्या मोटारपंप चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले.याबाबत गोंडपिपरी पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.मोटारपंप चोरणाऱ्या टोळीला पकडण्यात गोंडपिपरी पोलिसांना यश आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील सबमर्सिबल मोटरपंप चोरीस गेले.याबाबत गोंडपिपरी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आल्या.पोलीस या टोळीवर पाळत ठेवून होते. प्राप्त माहितीनुसार,गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा येथील एका शेतकऱ्यांची बैलजोडी अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत चोरट्यानी पळवून नेली.तेलंगणात विक्री दरम्यान गावकऱ्यांनी पकडून तेथील पोलीस पाटील व सरपंच यांच्याकडे सुपूर्द केली.घटनेची माहिती आष्टी पोलीस स्टेशनला दिली.विठ्ठलवाडा येथील तीन युवकाची आष्टी पोलिसांनी कसून चौकशी केली असता तेथील तब्बल ४२ युवकांचा सहभाग समोर आला.ही मोठी टोळी सक्रिय राहिल्याचे समजताच पुढील तपास प्रक्रिया गोंडपिपरी पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली.सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीसानी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली.विठ्ठलवाडा येथील महेश लडके,जगदीश फरकडे,शहाबुद्दीन शेख,निकेश कष्टी,प्रणित पोलोजवार, अजय कन्नाके,स्वप्निल गेडाम अशा एकूण सात आरोपीना अटक करून पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले. मात्र मुख्य आरोपी अजूनही फरार आहे .

सात आरोपिना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली करून सदर मोटारी कोठारी येथील दोन व्यक्तींना विकल्याचे सांगितले.सदर मोटार कोठारी येथील आरोपी सुरज कुचनकर सुखदेव देरकर यांच्याकडून जप्त करण्यात आल्या.चोरीच्या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ४५ हजार रुपयाचे मोटरपंप आणि साहित्य हस्तगत करण्यात आले.याप्रकरणी एकूण दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी अजूनही फरार आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलिस अधिकारी मुल यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु,पोलीस उपनिरीक्षक धर्मनाथ पटले,पोलीस हवालदार शंकर मन्ने,विलास कोवे, अमित गुरनुले यांनी केली आहे.