पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात डॉ.कुंदन वाघ यांची नियुक्ती
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :-पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर नसल्यामुळे गरीब रुग्णांचे हाल होत होते याची माहिती पिंपळगाव येथील देशदूतचे पत्रकार दिपक मुलमुले यांना मिळाली असता त्यांनी ताबडतोब महाराष्ट्र राज्य माळी समाज प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर यांना जाऊन सांगितले असता त्यांनी दोघानीं जाऊन जळगाव येथे सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन पिंपळगाव हरे येथे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी केली होती.
त्यांची मागणी मान्य करून आज दि.20 जून सोमवार रोजी सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी सोयगाव संपत वाघ यांचे चिरंजीव डॉ.कुंदन संपत वाघ शिक्षण M.B.B.S.फिलिपिन्स येथे शिक्षण पूर्ण केले आहे. रा.हळदा ह.मु.सिल्लोड यांची पिंपळगाव हरे ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली.
तसेच लवकरच अजून दोन डॉक्टर पिंपळगाव हरे येथील ग्रामीण रुग्णालयाला नियुक्त करण्यात येतील अशी माहिती सिव्हिल सर्जन डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.सिव्हिल सर्जन यांनी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाची तात्काळ दखल घेऊन डॉक्टरांची नियुक्ती केली त्या मुळे गावातील ग्रामस्तानतर्फे त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे