नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, सहा जण जखमी.

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,नवी मुंबईतील कामोठे पुलावर सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे 6 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सायन-पनवेल महामार्गावरील पुलावर पडलेल्या ट्रकचे काम सुरू होते. दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या वॅगनआरने ट्रकला धडक दिली. या अपघातात वॅगनआरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले.

या वॅगनआरला धडक दिल्यानंतर मागून येणारी इनोव्हाही बस आणि ट्रकमध्ये आदळली. या अपघातात इनोव्हामधील तीन जण जखमी झाले. अपघात होताच तेथून जाणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना कळवून वाहनात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. रूग्णालयातील काही जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
पुढील पोलीस तपास चालू आहे.