स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्क्यानी वाढ इधन दरवाढीचा परिणाम

स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्क्यानी वाढ इधन दरवाढीचा परिणाम

स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्क्यानी वाढ इधन दरवाढीचा परिणाम

✍सचिन पवार✍
📝माणगांव तालुका प्रतिनिधी📝
📞८०८००९२३०१📞

माणगांव :- कोरोनामुळे दीर्घकाळ शाळा बंद होत्या परंतु कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने या शेक्षणिक वर्षांपासून शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात शासनाने परवानंगी दिली आहे. त्यामुळे पालकांसह विद्यार्थीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे,मात्र वर्षभरात पेट्रोल डिझेल व सी एन जी च्या दरात ४० टक्क्यानी वाढ झाल्याने परिणामी स्कूल बसच्या भाड्यामध्ये ३० टक्क्यानी वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे परंतु कळत नकळत याचा फटका पालकांच्या खिशावर पडणार आहे.

माघील दोन वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे स्कूल बसची सेवा बंद होती टप्या टप्याने शाळा सुरु झाल्यानंतर पालकच मुलाची शाळेतुन ने आन करीत होते परंतु आता शाळा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्या आहेत त्यामुळे नोकरदार पालकांना मधल्या वेळेत आपल्या पाल्याला स्कूल मधून घरी जाऊन सोडणे अडचणीचे होऊ लागले आहे. परिणामी त्यांनी स्कूल बसकडे धाव घेतली पण तब्बल ३० टक्के भाढेवाढ झाल्याने पालकांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. पूर्वी एका विद्याथ्यासाठी लोकल ७०० रुपये जात होते आता कोरोनानंतर स्कूल बस, तसेच व्हॅन चालकांनी ९०० रुपये घ्यायला सुरुवात केली आहे कारण कोरोना काळात वाहन चालकाला मोठा तोटा सहन करावा लागला आहे त्यातच राज्य सरकार ने स्कूल बसचा दोन वर्षाचा रोड टॅक्स ही माफ केलेला नाही वाढती महागाई डिझेल दर सतत वाढत असल्यामुळे ३० टक्के भाडेवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.