अहेरी नगर पंचायत मान्सून पूर्व तयारीचा पहिल्याच पाऊसात उडाला फज्जा, अनेक घरात शिरले पाणी.

अहेरी नगर पंचायत मान्सून पूर्व तयारीचा पहिल्याच पाऊसात उडाला फज्जा,

अनेक घरात शिरले पाणी.

अहेरी नगर पंचायत मान्सून पूर्व तयारीचा पहिल्याच पाऊसात उडाला फज्जा, अनेक घरात शिरले पाणी.

मारोती कांबळे
गडचिरोली जिल्ह्या ग्रामीण प्रतिनिधी
मो.न.९४०५७२०५९३

तातडीने उपाययोजना करा अन्यथा नालीतला कचरा नगर पंचायत मद्ये आणून टाकू

भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांचा इशारा.

अहेरी : – अहेरी शहरात काल दीड तास आलेल्या पहिल्याच तुफान पावसात अहेरी नगर पंचायतच्या मान्सून पूर्व तयारीचा पूर्णपणे फज्जा उडाला असून शहरातील अनेक घरात, दुकानात पाणी शिरल्याने जनतेचे मोठे हाल झाले आहे, ह्याबाबत अनेक तक्रारी समोर येत आहे, नुकताच 8 जून रोजी झालेल्या नगरपंचायत सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी मान्सून पूर्व तयारीचा मुद्दा काढीत कोणतीही मान्सून पूर्वतयारी न केल्याने अहेरी नगर पंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते, परंतु अहेरी नगर पंचायत सत्ताधारी तथा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 10 दिवसांपासून कोणतीही हालचाल झाली नाही, येत्या काही दिवसात तातडीने उपाययोजना न केल्यास नालीतला कचरा अहेरी नगर पंचायत मद्ये आणून टाकू अभिनव पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी दिला आहे.
अहेरी शहरात पावसाळ्याच्या तोंडावर अनेक नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने त्या तुडुंब भरून आहेत ,एफ्रिल व में महिन्यात होणारी साफसफाई त्या पद्धतीने अद्याप करण्यात आलेली नाही, जास्त पाऊस झाला तर प्लास्टिक व कचरा साचल्याने पाणी समोर न जाता अनेक घरात हे पाणी शिरण्याचा धोका असल्याने तातडीने उपाययोजना करावे अशी जोरदार मागणी श्री.भाजपा नगरसेवक सर्वसाधारण सभेत केल्यावरही नगर पंचायत प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या उदासीन धोरणामुळे गेल्या 10 दिवसांत तातडीने कोणतेही उपाययोजना न केल्याने अहेरी शहरात कालच्या पहिल्याच पावसात अनेकांच्या घरात, दुकानात पाणी शिरल्याने जनतेला मोठा मनस्ताप सहन करावे लागले.
घनकचरा व्यवस्थापन साठी अहेरी नगर पंचायत तर्फे कंत्राटदारांला प्रति महिना 10 लाख रुपये दिले जाते परंतु प्रत्येक्षात नियमानुसार काम मात्र होत नाही, हा कंत्राट भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनला आहे, ह्याबाबत पहिल्या सर्वसाधारण सभेपासून आजपर्यंत सातत्याने भाजपा नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांनी आवाज उचलला असून समोरही घनकचरा व्यवस्थापनात जोपर्यंत बदल दिसत नाही तोपर्यंत आपण सातत्याने आवाज उचलत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.