किरमीटी सेवा सहकारी संस्थेवर अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड.
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड—नागभिड तालुक्यातील किरमीटी येथे नुकत्याच पार पडलेल्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपा पदाधिकारी श्री.मनोहर चौधरी यांच्या नेतृत्वात आणि मा.बंटिभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी तर्फे जय किसान पॅनल चे 13 उमेदवार विजयी झाले होते. आज पार पडलेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली.त्यात श्री.भिका तुकाराम दडमल यांची अध्यक्ष तर श्री.विजय सदुजी देशमुख यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी संतोष रडके तालुका अध्यक्ष,अरविंद भुते जि.प.प्रमूख,केदारभाऊ मेश्राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व अन्य विजयी उमेदवार लता सुधाकर सोनवाणे,कविता तानबा दडमल,विठ्ठल मोतीराम आळे,मनोहर गोविंदराव चौधरी,विजय नानाजी बदन,श्रावण जयमल नन्नावरे,भूषण दयाराम कामडी,रामकृष्ण लक्ष्मण शेंडे,खुशाल गोविंदा लोणारे, गुणवंत पुंडलिक चौधरी,माधव तुळशीराम कामडी यांनी घवघवीत विजय मिळवून सोसायटीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोवला आहे त्याबद्दल मा.आमदार बंटिभाऊ भांगडिया यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.