कोंढवी-फणसकोंड येथे खरीप भात पीक शेतीशाळा
✍🏻संदिप जाबडे✍🏻
📰मीडिया वार्ता न्यूज📰
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – 8149042267
पोलादपूर – तालुक्यातील कोंढवी ग्रामपंचायत हद्दीतील फणसकोंड येथे खरीप भात पीक शेतीशाळा तालुका कृषी कार्यालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती.
या खरीप भात पीक शेतीशाळेत प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी लागवड पध्दत, एसआरटी लागवड पध्दत, पट्टा पध्दत, चारसूत्री पध्दत त्याचबरोबर जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी महिलांचा शेतीशाळेत समावेश असल्याने महिलांचा शेतीमध्ये सहभाग कसा महत्वाचा आहे, याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी माहिती दिली.
यावेळी एकात्मिक पीक व्यवस्थापन संकल्पना पिकांना लागणारे खत व्यवस्थापन याबाबत कृषि सहायक प्रसाद भोकरे व कृषी पर्यवेक्षक गुंड यांनी माहिती दिली. यावेळी मागील वर्षी एसआरटी पध्दतीने लागवड केलेले शेतकरी रमेश येरुणकर यांनी त्यांचा अनुभव सांगितला. यावेळेस फणसकोंड येथील महिलांचा व शेतकऱ्यांचा सहभाग होता.
पोलादपूर तालुका कृषी कार्यालयामार्फत तालुक्यातील विविध भागातील शेतकऱ्यांसाठी याप्रकारची भातशेती कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आत्माचे कपिल पाटील यांनी दिली.