भाजप तर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदा ची उमेदवारी

भाजप तर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदा ची उमेदवारी

भाजप तर्फे द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदा ची उमेदवारी

✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197

मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,दिनांक 21 जून 2022 रोजी झालेल्या भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत व पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी व इतर सर्व सदस्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाच्या निवडणूकी करिता *श्रीमती द्रौपदी मुर्मू* यांचे नाव एकमताने घोषित करण्यात आले.

द्रौपदी मुर्मू यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशामध्ये झाला. त्या दिवंगत बिरांची नारायण तुडू यांच्या कन्या आहेत. त्यांचा विवाह श्री श्याम चारम मुर्मू यांच्याशी झाला होता व ते ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील कुसुमी ब्लॉकमधील उपरबेडा गावातील संथाल आदिवासी कुटुंबातील आहेत, प्रथम, 1997 मध्ये, त्या ओडिशाच्या राजरंगपूर जिल्ह्यात नगरसेवक म्हणून निवडून आल्या. पुढे येथून आमदार निवडून आप्या, 1997 मध्ये, भाजप ओडिशा युनिट, एसटी मोर्चाच्या उपाध्यक्ष देखील बनल्या.
त्यांनीं श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च, रायरंगपूर येथे मानद सहाय्यक शिक्षिका आणि पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहाय्यक म्हणून काम केले आहे. द्रौपदी मुर्मू यांनी 2002 ते 2009 आणि पुन्हा 2013 मध्ये मयूरभंजच्या भाजप जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले.
द्रौपदी मुर्मू या दोन वेळा भाजपच्या आमदार आहेत आणि नवीन पटनायक (बिजू जेडी आणि भाजप युती) सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीही होत्या. ओडिशा विधानसभेने द्रौपदी मुर्मूला सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीलकंठ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपालही होत्या.
द्रौपदी मुर्मू यांनी जीवनातील प्रत्येक अडथळ्याचा सामना केला. पती आणि दोन मुले गमावल्यानंतरही त्यांचा समाज सेवेचा संकल्प पक्का आहे. वनवासी समाजाच्या उत्थानाच्या कामाचा त्यांना 20 वर्षांचा अनुभव आहे आणि त्या भाजपसाठी एक मोठा आदिवासी चेहरा आहेत! आपल्या महामहिम राष्ट्रपतींना आगाऊ शुभेच्छा.