रामवाडी ग्रामस्थ नागरी सुविधांपासून वंचित.पावसाळ्यात गटारे तुंबण्याचे प्रकार नेहमीच होत असून याहीवर्षी पुन्हा घरात येणार पाणी.रस्त्यांची दुरवस्था, शौच टाकीचे पाणी येते रस्त्यांवर
✍सचिन पवार ✍
माणगांव तालुका प्रतिनिधी
📞८०८००९२३०१📞
माणगांव :-रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील असलेल्या महत्वाचे ठिकाण म्हणजे रामवाडी. कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे अधिकृत स्थानक येथे असले तरी रामवाडी नगर परिषद प्रशासनातर्फे दुर्लक्षित असलेले ठिकाण होय.
रामवाडी येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून नागरी सुविधांपासून वंचित असल्याच्या तक्रारी करत आहेत.शहरात असलेली गटारे ही साफसफाई च्या प्रतीक्षेत आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी साफसफाईची कामे होणे महत्वाचे असते.सदरच्या ठिकाणी दूषित पाणी, गाळ आणि कचरा साचला आहे. त्यामुळे पडणाऱ्या पावसाचे पाणी हे साचून रोगराई पसरण्याची भीती नाकारता येत नाही. त्यामुळे आता तरी नगर परिषद प्रशासनातर्फे याची दखल घेऊन सदर नाल्याची स्वच्छता करणे महत्वाचे आहे.
अजून बऱ्याच ठिकाणी गटारे तयार करण्यात आली नसून ज्या परिसरात गटारे झाली आहेत त्या परिसरातील गटारांची अवस्था खूपच वाईट आहे.
पावसाळ्यात गटारे तुंबण्याचे प्रकार नेहमीच होत असतात. त्यामुळे घरांमध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गटारांची अशी अवस्था असताना ठिकठिकाणी बरेच दिवस कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत होते.
याबाबत नागरिकांनी आता आवाज उठविल्यानंतरच काही अंशी कचरा उचलला जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नगरपालिका प्रशासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रामवाडी येथे नगर परिषद असतानाही नागरीकांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त करताना पेण मधील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत मधील गावागावात चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याच्या भावना त्यांनी बोलून दाखविल्या.
रामवाडीमध्ये काही भागात शौचालयाची टाकी भरल्यानंतर तो साफ करण्यासाठी गाडी येत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्या लोकांनी संडासाचे पाणी रस्त्यावर सोडायचे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
येथील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने जर का एकाद्या घराला चुकून आग लागली तर ती विझविण्यासाठी तेथे अग्निशमन ची गाडी पण पोहचू शकत नाही.
ही समर्थनगर रामवाडील नागरिकांसाठी फार मोठी शोकांतिका आहे.
कधी या गोष्टींकडे नगरपालिकेचे लक्ष केंद्रित होईल
शहरांपेक्षा गाव बरा असेच आता रामवाडील नागरिकांना वाटू लागले आहे.