विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या, आतातरी महाराष्ट्रद्रोही चाळे बंद करा – अनिल देशमुख

नागपुर:- विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.आघाडीचा तब्बल ५० वर्षांनी महाविजय या मतदारसंघात झाला आहे.

Tweet

ANIL DESHMUKH
@AnilDeshmukhNCP
ये क्या हुआ?
कैसे हुआ?
कब हुआ?
क्यों हुआ?..ये ना पुछो!
विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. #महाविकासआघाडी ला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी.ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत #भाजपा

इकडे पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला.एक डिसेंबरला या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर काल (गुरुवार) या निवडणुकांच्या मतमोजणीस सुरुवात झाली होती.

दरम्यान, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून हाविकास आघाडीकडून सतीश चव्हाण तर त्यांच्याविरोधात भाजपचे शिरीष बोराळकर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये सतीश चव्हाणांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या या महाविजयावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया देत भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. क्या हुआ?, कैसे हुआ?, कब हुआ?, क्यों हुआ?..ये ना पुछो! विरोधकांच्या गर्विष्ठ माना जनतेने वाकवल्या. महाविकासआघाडीला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार कौल दिलाय. आतातरी विरोधकांनी महाराष्ट्र घडवण्याच्या कामी सरकारला साथ द्यावी. ते जमत नसेल तर महाराष्ट्रद्रोही चाळे तरी बंद करावेत’. असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here