महाराष्ट्रात सत्तांतर- मुंबई गुवाहाटी व्हाया सुरत

अजित दुराफे

मुंबई महानगर प्रतिनिधी

मो.न. 77180 95197

मुंबई ते गुवाहटी थेट फ्लाईट असताना प्रत्येक सेना आमदार महाराष्ट्र ते सुरत आणि मग सुरत ते गुवाहटी असे का जात आहेत?

येऊ आता मूळ मुद्द्याकडे. खूप लोकांना असा प्रश्न पडला आहे की ही सेनेची चाल आहे. आगामी बीएमसी निवडणुका व इडी च्या कारवाई पासून स्वतःला वाचवण्यासाठी ही सेनेची खेळी आहे. तसंही सेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्री पद भूषवल आहेच व पूर्णपणे एक्सपोज झालेत, म्हणून भाजप बरोबर युती करू पाहत आहेत.

परंतु काही लोकांना हा ही प्रश्न पडला आहे की एकनाथ शिंदेच हे खरोखरच बंड आहे व सेना आमदार नाराज आहेत तर त्यांनी ३ जून रोजी राज्यसभा निवडणुकीत संजय राऊत यांना मतदान करून पुन्हा खासदार का केले व २० जून रोजी सेनेचे दोन आमदार विधान परिषदेवर निवडून का पाठवले?

जास्त मागे न जाता एक छोटा पुरावा देतो आज सेना आमदार शिरसाट यांनी जे पत्र उध्दव ठाकरे ना लिहिलं आहे त्या पत्रात तुम्हाला उत्तर मिळेल, कारण त्या मध्ये त्यांनी सरळ सरळ उध्दव ठाकरेंच्या आजू बाजूला जे ‘बडवे’ आहेत त्यांच्यावर अटॅक केला आहे आणि एवढ सगळं होऊन ही सेना आमदारांनी व एकनाथ शिंदे नी सेनेशी गद्दारी ना तेव्हा केली ना आज करत आहेत. जर त्यावेळी त्यांनी स्वपक्षातील उमेदवाराना मतदान न करता दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान केले असते तर त्यांच्यावर गद्दारीचां शिक्का ह्याच बडव्यांनी मारला असता व त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून बाहेरचा रस्ता दाखवला असता.

पण एवढं सगळं होऊन ही ना सेना पक्षप्रमुखानी त्यातून काही बोध घेतला किंवा त्यांच्या आजूबाजूला जी चांडाळ चौकडी आहेत ना त्यांनी त्यातून काही बोध घेतला. उलट आमदारांनी एकनिष्ठेने मतदान केल्यानंतर ह्याना तेव फुटला की हे आपल्याशी गद्दारी करूच शकत नाहीत किंवा हे कुठे ही जाऊ शकत नाहीत आणि पक्ष आपल्या पूर्ण कंट्रोल मध्ये आहे. पणं हा कोणी ही विचार केला नाही की जे आमदार आपल्या कडे त्यांच्या मतदार संघातील कैफियत मांडत आहेत, त्यांना निधी भेटत नाही, सेना आमदारांवर वारंवार अन्याय होतोय, मुख्यमंत्री पक्षप्रमुख त्यांना भेटत ही नाहीत पणं त्यांच्या समस्यांच काय? त्यावर तोडगा कसा काढायचा? ह्याचा कोणी ही विचार केला नाही. जर सेना आमदार खरच गद्दार असते तर त्यांनी राज्यसभा व विधान परिषदेला मतदान केले असते का?

मग आज शिवसेना कुठल्या तोंडाने स्वपक्षातील आमदारांना गद्दार म्हणत आहे? शिवसैनिक एकनाथ शिंदेना शिवीगाळ करत होते ते कुठल्या तोंडाने शिव्या देत होते? उद्धव ठाकरे गद्दार नाही म्हणाले पण शिंदे यांना लाकूडतोड्या ची उपमा दिली. तुम्ही जर पक्षाशी एवढेच एकनिष्ठ होते तर ज्यावेळी तुमच्या आमदारांवर अन्याय होत होता त्यावेळी उध्दव ठाकरे ला एका ही सर्व सामान्य शिवसैनिकाने जाब विचारण्याची हिम्मत का केली नाही?

आता येऊ पुन्हा मूळ मुद्द्याकडे की हे सगळ अचानक कस घडलं? आणि हे कस शक्य आहे? म्हणजे हे नेमकच काहीतरी प्लॅनिंग करून केलं असणार. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की होय हे सगळं मायक्रो प्लॅनिंग करूनच सगळं घडलेलं आहे. पणं तुम्ही जो विचार करताय तो नाही तर “तुम्ही लेखाच्या सुरुवातीची पाहिली ओळ वाचली तर सर्व लक्षात येईल”.

आता पुन्हा प्रश्न उभा राहतो की हे सगळं घडत असताना किंवा घडण्याच्या काही तास अगोदर सुध्दा कुणालाच कशी कानोकान खबर लागली नाही? तर ह्या सर्व प्रकरणाची खबर शरद पवारांना लागली होती आणि विधान परिषदेच मतदान चालू असतानाच शरद पवार कुणाला काहीच न सांगता तडकाफडकी दिल्लीला निघून गेले व पुन्हा भाजप बरोबर आम्ही यायला तयार आहोत अशी गळ घातली परंतु त्यांना तेथून कुठलही ठोस उत्तर न मिळाल्याने आल्या पावली माघारी धाडले.

आता पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित होतो की गृहखात राष्ट्रवादी कडे असताना आणि राष्ट्रवादीला हे बंड होणार आहे हे माहीत असताना त्यानी सेना आमदारांना गुजरात ला जाऊच कस दिलं? तर राष्ट्रवादी ला हे बंड होणार आहे हे माहीत होत परंतु एवढ सूक्ष्म प्लॅनिंग केल असेल हे त्यांना माहीत नव्हत आणि अस ही त्यांना सेना संपण्याशी मतलब होता, साप तर मारायचा पण तो जर दुसऱ्याच्या काठी ने मारला जात असेल तर अती उत्तम, त्यामुळे ही गोष्ट फक्त राष्ट्रवादीत दाबून ठेवली, सेनेला याची कानोकान खबर पोहचू दिली नाही व गाफील ठेवलं.

आता ह्या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी व काँग्रेस सेनेचा पुन्हा गेम करत आहेत परंतु अजूनही त्यांच्या लक्षात येत नाही, काल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केलं की महाविकास आघाडीचे प्रमुख उध्दव ठाकरे आहेत व ते जे निर्णय घेतली तो काँग्रेस ला मान्य असेल. आणि आज राष्ट्रवादीची बैठक झाल्या नंतर जयंत पाटलांनी जाहीर केलं की आम्ही उध्दव ठाकरेंच्या पाठी खंबीरपणे उभे आहोत पणं कसे उभे आहोत त्या साठी काय करावं लागेल हे कोणीच सांगत नाहीये.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ची प्लॅनिंग क्लिअर आहे व त्यांना कुठल्याही परिस्थितीत उध्दव ठाकरेंना राजीनामा देऊ द्यायचा नाही व विशेष अधिवेशन बोलवून तांत्रिक कारणांवरून बंडखोर आमदारांचे निलंबन करू ही उध्दव ठाकरेंच्या डोळ्यांवर पट्टी चढवलेली आहे. पणं त्यांनाही खर माहीत आहे की अस काहीही होणार नाही व हे प्रकरण लांबवुन विश्वास ठरावा पर्यंत घेऊन जायचं. कारण त्यामुळे शिंदेकडे कुठलाही ऑप्शन शिल्लक राहणार नाही आणि ते स्वतंत्र गट तयार करून आपलं 2/3 बहुमत सिध्द करणार व शिवसेनेवर ही ताबा मिळवणार. पण आज जर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला तर बंडखोर आमदार पुन्हा माघारी येतील व ते सांगतील तेच ऐकावं लागणार उध्दव ठाकरेंना, त्यामुळे पक्ष ही फुटण्यापासून वाचेल व अडीच वर्षात सेना आमदारांवर जो अन्याय झाला आहे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना धडा शिकवल्याच समाधान ही मिळेल आणि सत्तेपासून लांब ही ठेवता येईल.

आणि सर्वात महत्त्वाचं, इथुन जे सेना आमदार गुवाहटी ला जात आहेत आणि त्यावर विविध मते व्यक्त केली जात आहेत की त्या मध्ये यांनी पाठवलेले काही ट्रोजन हॉर्स असू शकतात तर तुमच्या माहिती करिता सांगतो ते जे जाणारे आमदार आहेत ते सगळे सुरत वरून जातात आणि आता उध्दव कडे जे आमदार आहेत त्यात शिंदे चे किती ट्रोजन हॉर्स असतील हे तुम्ही विचार ही करू शकत नाहीत, कारण पेंग्विन चे जेवढे वय व उध्दव ला जेवढं राजकारण समजत तेवढ्या वर्षांचा एकनाथ शिंदेंचा राजकीय अनुभव आहे. त्याव्यतिरिक्त, एकनाथ शिंदे हा दिघेंच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे.

यात कर्नाटक पॅटर्न स्पष्ट दिसत आहे. कर्नाटकातील येड्यूरप्पा सरकार ने काँग्रेस-जेडीएस चे आमदार फोडले. त्यावेळी हाच पॅटर्न होता. सर्व आमदारांशी वाटाघाटी पूर्ण करून त्यांच्या सर्व अपेक्षांवर 100% खात्रीशीर तोडगा काढण्यात आला. सोप्या भाषेत ‘प्री-पेड’ ऑफर होती.

दिलेली ऑफर प्रि-पेड असल्याने, मग डी के शिवकुमार बेंगळुरू वरून मुंबईत आला आणि हॉटेल बाहेर 4 दिवस विनवण्या करत बसला, तरी एकही आमदार फुटला नव्हता. तिकडे युड्यूरप्पा शांत बसले होते. शेवटी एकही आमदार न फुटता, रेकॉर्ड 5 दिवस चाललेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेनंतर शेवटी नाईलाजास्तव सरकारला राजीनामा द्यावा लागला.आज महाराष्ट्रातून जाणारे आमदार आधी सुरत ला का जात आहेत, आणि मगच तिकडून गुवाहाटी ला? याचं रहस्य कदाचित यात लपलेले आहे.

साiहेब आजारी असताना शिंदे यांनी साहेबांना वचन दिले होते की शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही.!!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here