एकनाथ शिंदे गटाला पवार व राऊतांच्या धमक्या?
✍अजित दुराफे ✍
मुंबई महानगर प्रतिनिधी
77180 95197
मुंबई : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की ,शिंदे गटाला “तुम्ही मुंबईत पाय ठेवलात की तुम्हाला बघतोच” वगैरे धमकी देणारे खरोखरच बेअक्कल आहेत.
महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८८ सदस्यांपैकी एका (शिवसेनेच्या) आमदाराचा मृत्यू झाला आहे. तर दोघे (राष्ट्रवादी काँग्रेस) आमदार तुरूंगात असल्यामुळे ते कोणत्याही प्रकारच्या मतदानात भाग घेऊ शकत नसल्याचे राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत आपण पाहिले आहेच. थोडक्यात २८५ पैकी १४३ आमदार ज्या पक्ष अथवा आघाडीकडे आहेत, तेच बहुमत सिद्ध करू शकतील.
मविआच्या गोटातील ४८ आमदार सध्या गुवाहाटीला असून, काँग्रेसचे ४४, राष्ट्रवादीचे ५१ आणि उद्धवसेनेचे केवळ १७ आमदार या आघाडीकडे ११० आमदार शिल्लक आहेत. मविआच्या गोटातील अपक्ष आमदार केव्हाच विखुरले असून, अशावेळी भाजपचे १०६ व त्यांच्यासोबत असणारे किमान ७ अपक्ष आमदार असे किमान ११३ जणांचे संख्याबळ मविआपेक्षा वरचढ ठरेल. राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने आपले संख्याबळ १२३ पर्यंत नेऊन ठेवल्याचे आपण पाहिले आहेच. त्यामुळे आता संख्याबळ नक्कीच मविआच्या बाजूने नाही.
शिवाय भाजप आपल्याकडील संख्याबळ दाखवून तूर्तास अल्पमताचे सरकार देखील स्थापन करू शकतो. एकदा का सत्ता हातात आली की, यावेळी फडणवीस सुद्धा तुमच्या कृपेने तावून–सुलाखून तयार झाले आहेत. शिवाय योगी आदित्यनाथ आणि हेमंत विश्व शर्मा यांनी सुद्धा गृहविभाग कसे राबवायचे, याचे धडे फडणवीसांना दिले असतील. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या वाटेला जाणाऱ्यांचे काही खरे नाही.
तेव्हा तुमच्याच आमदारांना पोकळ धमक्या देणे पवारांच्या अंगाशी येऊ शकते.