*माणगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल*
*✍🏿दिपक दपके*
*माणगाव शहर प्रतिनिधी*
*मो, नं ,/ 9271723603*
मिळालेल्या पोलीस सूत्रानुसार / दिनांक.२२/०६/२०२२ रोजी दुपारी १३.०० वा.चे. सुमारास आरोपी क्र,१ हा,रा. होडगाव बौध्दवाडी, ता. माणगाव जि. रायगड,आरोपी क्रमांक ०२ ही महिला आपला बाजार समोर, कचेरी रोड, ता. माणगाव, जि. रायगड येथे राहत असलेल्या भाडयाचे रुममध्ये यांतील आरोपीत क्र.०१ व आरोपी क्र ०२ यांनी संगणमत करुन तिचे माणगाव कचेरी रोडवरील भाडयाचे रुमवर फिर्यादी महिला , वय – ५५, व्यवसाय मोलमजुरी, रा.खर्डी खुर्द, पो. पळसगाव खुर्द ता.माणगाव, जि.
रायगड यांना बोलावुन आरोपीत क्र. ०२ या फिर्यादी / यांना काहीएक न सांगता कामानिमित्त बाहेर गेल्या व जाताना बाहेरुन रुमची कडी लावुन गेली. त्यावेळी फिर्यादी / महिला या किचनमध्ये काम करीत असताना आरोपी क्र.०२ महिला या परत आल्यानंतर आरोपीत क्र. ०१ हा घरी जाण्याकरीता निघाला असता आरोपीत क्र.०२ या आरोपीत क्र. ०१ यास म्हणली की, तु जसे तुझे पत्नीला व मला खुश | ठेवतो तसे हिला सुध्दा ठेव असे बोलली असता आरोपीत क्र. ० १ याने त्याचे अंगावरील शर्ट काढुन तो फिर्यादी हिचे पाठीमागे उभा राहीला व बोलला की, तु माझे सोबत बेडरुमध्ये चल असे बोलुन फिर्यादी हिचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व आरोपीत क्र.०२ हिने दि. २४/०६/२०२२ रोजी मोबाईल वरुन फिर्यादी हिचे मोबाईलवर फोन करुन सदरची गोष्ट जर कोणाला सांगीतली तर फिर्यादी यांना मारण्याची धमकी दिली म्हणुन फिर्यादी यांनी माणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून भा.दं.वि.सं. ३५४,३४२, ५०६, ५०७, ३४, पुढील तपास तपासी अंमलदार- मपोना / १९४ एन. एस. धनावडे माणगाव पोलीस ठाणे / पोना / १६२४ खिरीट,
उपविभागीय पोलीस अधिकारी सो. माणगांव श्री. प्रविण पाटील/पो.नि. श्री. आर. पी. पाटील माणगांव पोलीस ठाणे