शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणा बाजीने शहर दणाणले…
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आंगार है बाकी सभ भंगार है च्या घोषणाबाजी पाचोरा शहर दणाणले….
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा = पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसैनिका तर्फे उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ हर हर महादेव चा जय जय कार करित सर्व शिवसैनिकांनी शिव मंदिर येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत कायम राहण्याची शपथ घेतली.त्यांंनतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजी करत बंडखोर एकनाथ शिंदे व सर्व आमदारांना परत येण्याच्या घोषणाबाजी करीत उध्दव ठाकरे साहेब आंगार है बाकी सभ भंगार है अशा घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.
आम्ही स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीत वाढलो आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सेनेत आहोत. याच शिवसेनेत राहू, पक्षबळकट करण्यासाठी प्रयत्न करु. आज आम्हाला माजी आमदार स्व.आर ओ पाटील यांची प्रखरतेने आठवण होत आहे ते असते तर असे झालेच नसते.शिवसेना चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अाम्ही खंबीरपणे उभे राहू
आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत, काही झाले तरी आम्ही शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना ताकद देवू, कितीही संकटे आली तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत झालो असल्याने मुळ शिवसेना हीच आमची शिवसेना आहे.
राज्यात कितीही उलथापालथ झाली तरी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार, त्यांना सोडणार नाही, आमदार किशोर पाटील ही
शिंदे गटासोबत राहणार नाहीत, ते परत येतील असा विश्वास पाचोरा येथील शिवसैनिकांनी व्यक्त केला.आमदार किशोर पाटील परत यावे, शिवसेना अंगार है बाकी सभ भंगार है अशा घोषणाबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाचोरा दणाणले होते. यावेळी भरत खंडेलवाल, दिपकसिंग राजपुत, रावसाहेब पाटील, अॅड अभय पाटील, रमेश बाफना, आरुण पाटील, अजय पाटील, उध्दव मराठे, वाल्मीक जाधव, विलास पाटील, पप्पू राजपुत, आरुण तांबे, शंकराभाऊ मारवाडी, दिपक पाटील, आदींसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते