महामानवांच्या संयुक्त जयंती निमित्त “भीमा तुम्हां वंदना” समस्त कलाकार परिवार तर्फे संकल्पना “एक वही-एक पेन” आणि ‘विनामुल्य प्रवेश’….
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.- ९८६९८६०५३०
मुंबई-भीमा तुम्हां वंदना – २०२२ पर्व ४ थे हा समस्त महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त सांगितिक मानवंदनेचा कार्यक्रम शनिवार १६ जुलै, २०२२ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या दोन सत्रात रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे सादर होणार आहे.
तसेच या कार्यक्रमाला प्रवेश विनामुल्य असणार आहे. नेहमीप्रमाणे ‘एक वही-एक पेन’…ही संकल्पना यंदाही राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमात केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतातून विविध स्तरातील अनेक नामवंत कलावंत जसे गायक, वादक, निवेदक, नर्तक तसेच तंत्रज्ञ मंडळी आपले योगदान देणार आहेत.
या संकल्पनेची सुरुवात २०१७ साली वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे झाली. त्यानंतर २०१८ आणि २०१९ सालापर्यंत निर्विघ्नपणे या संकल्पनेच्या माध्यमातून समस्त कलाकारांच्यावतीने महामानवांची संयुक्ती जयंती मोठ्या जोमाने साजरी झाली. पण २०२० सालच्या कोरोनाच्या महामारीने या परंपरेला मात्र खीळ बसली.
पण यंदा मात्र हि सर्व कलावंत मंडळी पुन्हा एकदा नव्या जोशात हि संयुक्त जयंती साजरी करण्यासाठी सज्ज झालेली आहेत.
“भीमा तुम्हां वंदना” – २०२२ पर्व ४ थे हा केवळ एक कार्यक्रम नसून समस्त कलाकारांच्यावतीने समस्त महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वाहिलेली सांगितिक मानवंदना आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक तसेच वैद्यकीय उपक्रम गेली ६ वर्षे सातत्याने राबविले जात आहेत.
आपणही सदर कार्यक्रमात आपले श्रमिक आणि आर्थिक योगदान द्यावं आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी या कार्यक्रमाचा भाग व्हावं, हिच आपल्या सर्वांना नम्र विनंती.