स्वराज्य फाऊंडेशन मुंबई संस्थेने केले अपघातग्रस्त युवकाचा १ लाख ७५ हजार रुपयांचा वैद्यकीय खर्च माफ
एम जी एम रुग्णालय कामोठे यांचे सहकार्य
📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – ८१४९०४२२६७
पोलादपूर(रायगड) – मूळचा महाड तालुक्यातील भोराव गावचा रहिवाशी असलेल्या शशांक सोनावणे या युवकाच्या दुचाकीचा पनवेल कळंबोली येथील मार्गावर १९ जून २०२२ रोजी अपघात झाला. या अपघातात शशांकच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापती झाल्याने त्याला उपचारासाठी एम जी एम रुग्णालय कामोठे येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर ३ शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. परंतु यासाठी तब्बल १ लाख ७५ हजार इतका वैद्यकीय खर्च लागणार होता. सोनावणे कुटुंबासाठी हा खर्च खूपच जास्त होता. स्वराज्य फाउंडेशन मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या सदस्या अश्विनी दिनेश साळुंखे यांनी ही माहिती संस्थेच्या आरोग्य विभाग मुख्याधिकारी श्रद्धा धाबे व पुष्पा रेड्डी यांना सांगितल्यावर त्यांनी हॉस्पिटल ला धाव घेऊन डॉक्टर लक्ष अग्रवाल यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण वैद्यकिय खर्च माफ केला.
स्वराज्य फाउंडेशन मुंबई, महाराष्ट्र या संस्थेने एका गरीब कुटुंबातील युवकास केलेली ही मदत नक्कीच वरदान ठरली आहे. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल कुटुंबीयांनी आभार मानले तर समाजातील सर्व स्तरातून संस्थेचे कौतुक केले.