दहावीच्या परीक्षेत तालुक्यातून द्वितीय ठरलेल्या अनुष्का बाबाजी कदम हिचा समविचारी बांधवांकडून सत्कार
📰मीडिया वार्ता न्यूज📰
✍🏻संदिप जाबडे✍🏻
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
संपर्क – ८१४९०४२२६७
पोलादपूर(रायगड) -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२२ च्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षे चा निकाल १७ जून रोजी ऑनलाइन जाहीर झाला. यामध्ये तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय लोहारे शाळेच्या अनुष्का बाबाजी कदम हिने ९१.२०% गुण संपादित करीत तालुक्यातून द्वितीय येण्याचा बहुमान पटकाविला.
दिवील सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने सेमी इंग्रजी माध्यमातून तब्बल ९१.२०% पर्यंत मजल मारल्याने तालुक्यातील समविचारी बांधवांकडून तिच्या घरी जावून ‘ महाडचा मुक्तिसंग्राम ‘ हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने तिच्याशी बातचीत केल्यावर मुंबई येथील प्रसिद्ध महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून उच्च शिक्षण घेण्याचा मानस असल्याचे अनुष्का हिने सांगितले. आपल्या यशात आई, वडील व सोनावणे कुटुंबीय यांचे फार मोठे योगदान असल्याचे अनुष्का कदम या विद्यार्थिनीने आवर्जून सांगितले.
आयोजित सत्कारास राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ तालुका अध्यक्ष संदिप जाबडे, मराठा सेवा संघ अध्यक्ष विवेकांत मोरे, समाजसेवक सूरज मोरे, व्ही के बॉईज खालूबाजा समीर पवार व अजय मोरे, संकेत झाडे, रोहित मोरे आदी समविचारी बांधव उपस्थित होते .