सकमुर गावात रानडुक्कराचा माणसांवर जिवघेणा हल्ला
निवेदन देऊनही वन विभागाचे दुर्लक्ष
राजेंद्र झाडे
चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :- तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेले काही दिवसांपासून जंगली डूक्करांच्या हैदोशामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहे काही दिवसांपूर्वी अंकीता नेहरू गोंगले मु चेकबापूर सकमुर या महीलेवर डुक्कराने गावात शीरून हल्ला केला . यामुळे महीला गंभीर जखमी झाली त्यामुळे गावातील जनतेत डुक्कराच्या भितीने दहशत निर्माण झाली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन विभागाने तात्काळ जखमी महीलेला आर्थिक मदत करावी व जंगलातील डुक्करांचा बंदोबस्त करावा जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत असे नीवेदन आज ग्राम पंचायत सकमुर चे सदस्य श्री संतोष रामय्या मूगलवार यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी धाबा यांना दिले होते निवेदन देऊनही वन विभागाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याने आज पुन्हा एकदा गावातील गिरीधर झाडे या व्यक्ती वर डुक्कराने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे लवकरात लवकर वनविभागाने कारवाई करावी अशी मागणी समस्त गावकरी करीत आहेत